Cheteshwar Pujara Announced Retirement: टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujar ) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुजारा बराच काळ टेस्ट टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे.
Cheteshwar Pujara Announced Retirement: सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट.
चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की,
“भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी तुमचे सर्वोत्तम देणे – याचा खरा अर्थ शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. पण जसे ते म्हणतात, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट झाला पाहिजे आणि अपार कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!”
ODI World Cup 2027 चा प्लान तयार, या देशात या महिन्यात रंगणार थरार; खेळवले जाणार तब्बल एवढे सामने..!
पुजाराने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला होता? (Cheteshwar Pujara’s Lat international Match)
चेतेश्वर पुजाराची बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये निवड होत नव्हती. निवडकर्त्यांचे लक्ष आता नवीन आणि तरुण खेळाडूंकडे वळत आहे. पुजाराने ७ जून २०२३ रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
Indian Cricket टीम के खिलाडी चेतेश्वर पुजारा ने सभी प्रकार के अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास लेने का ऐलान कर दिया है. इससे पहले वो आयपीएल से भी हु चुके है रिटायर..#HappyRetirement
#CheteshwarPujara pic.twitter.com/frZwa599Qp— T20 SPORTS (@t20sportsIN) August 24, 2025
पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे शेवटचा सामना खेळला. या सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पुजाराने या सामन्याच्या पहिल्या डावात १४ आणि दुसऱ्या डावात २७ धावा केल्या होत्या.
अशी होती चेतेश्वर पुजाराची क्रिकेट कारकीर्द (Cheteshwar Pujara Cricket Carrer)
चेतेश्वर पुजाराने टीम इंडियासाठी १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. त्याने १०३ कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ७१९५ धावा केल्या. या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०६ धावा होती. पुजाराने कसोटीत १९ शतके, ३५ अर्धशतके आणि ३ द्विशतके केली. याशिवाय, पुजाराने एकदिवसीय सामन्यात फक्त ५१ धावा केल्या होत्या.
हेही वाचा:
1 Comment
Pingback: Team India Players Retirement: पिछले कुछ महिनो मे टीम इंडिया के 6 खिलाडीयोने लिया संन्यास, लिस्ट मे एक से एक स्टार खिल