खरा खेळ आता सुरु झालाय, देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जाऊन आलेत..
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे.
त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यासंदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.” असं ते म्हणाले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..