भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती शर्मा (Aditi Sharma) तिचा पती अभिनीत कौशिकला (Abhinav Koushal) घटस्फोट देणार आहे.
त्यांच्या लग्नाला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. दोघांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न केले. या लग्नाला फक्त नऊ महिने झाले आहेत. अदिती शर्माने नऊ महिन्यांच्या लग्नाला ४ महिने गुप्त ठेवले. आणि आता त्यांच्या वेगळे होण्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनीतने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…
अदितीचे विवाहबाह्य संबंध ठरणार घटस्फोटाचे कारण?
अभिनेत्री अदिती शर्मा लग्नाच्या ९ महिन्यांनंतर तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे. त्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी एका साध्या समारंभात लग्न केले. अभिनीतने उघड केले की, अदितीने तिच्या करिअरसाठी लग्न गुप्त ठेवण्याची मागणी केली होती. गेल्या दीड वर्षांपासून अदिती त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, सुरुवातीला अभिनीत यासाठी तयार नव्हती. तथापि, नंतर त्याने या लग्नाला होकार दिला.
याशिवाय, त्यांनी असेही सांगितले की, आदितीने लग्न गुप्त ठेवण्यास सांगितले कारण इंडस्ट्रीमध्ये लग्न करणे निषिद्ध मानले जाते. कायदेशीर सल्लागार राकेश शेट्टी यांनी त्यांच्या लग्नाची पडताळणी केली आणि फोटो शेअर केले. त्यांनी असेही सांगितले की लग्नापूर्वी दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. अभिनीतने आदितीवर सह-अभिनेत्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे.
अभिनीत कौशिकने आदिती शर्मावर तिच्या ‘अपोलिना – सपनो की ऊंची उडान’ मालिकेतील सह-अभिनेता समर्थ गुप्तासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
अभिनीत आणि त्यांच्या कायदेशीर टीमने सांगितले की, आदितीने घटस्फोटासोबत २५ लाख रुपयांची पोटगी देखील मागितली आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा प्रकरण गंभीर झाले तेव्हा आदितीच्या वडिलांनी रागाच्या भरात अभिनीतला कानाखाली मारली. त्यामुळे हे नाते आणखीनच कमकुवत होऊन आता लवकरच यांचा घटस्फोट होणार आहे.
अदिती शर्मा ही धनश्री वर्माची मैत्रीण आहे. धनश्रीआणि चहल यांचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला असून त्यांच्याही वेळेस असेच आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.
हेही वाचा:
2 Comments
Pingback: कच्चा बादाम फेम अभिनेत्री 'अंजली अरोरा' थायलंड मध्ये बनली बार डान्सर? , व्हिडीओ होतोय तुफान व्
Pingback: RJ Mahvash Copied Yuzi Chahal Style: आरजे महवशने फिरसे युझी चहल को किया कॉपी, फेंस बोले अब तो पक्का डेट कर रहे..! - t20sports.in