ENG vs AUS live: २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा सिद्ध केला.
पर्थ स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या पहिल्याच सत्रात स्टार्कने चेंडूने जबरदस्त प्रभाव पाडला आणि इंग्लंडच्या टॉप-ऑर्डरला धक्का दिला. या कामगिरीसह स्टार्कने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावावर एका मोठा विक्रम केला आहे.
ENG vs AUS live: स्टार्कने पहिल्याच षटकात क्रॉलीची विकेट घेतली.!
स्टार्कने सामन्याच्या पहिल्या षटकात जॅक क्रॉलीला शून्य धावावर बाद केले. त्यानंतर त्याने बेन डकेटला शून्य धावेवर बाद करून इंग्लंडची सुरुवात आणखी कठीण केली.त्यापाठोपाठ जो रूटला शून्य धावेवर बाद करून त्याने इतिहास रचला आहे.
Mitchell Starc completed 100 Wickets in Ashesh🫡🫡
The man, the legend! pic.twitter.com/6rdbuqgcjq— Kishan (@Kisna_Kusale) November 21, 2025
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटला शून्य धावेवर बाद करून स्टार्कने त्याच्या स्पेलमधील सर्वात मोठे यश मिळवले. या विकेटसह, स्टार्क अॅशेसच्या इतिहासात १०० बळी (100 Wickets in Ashesh History) घेणारा पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज बनला.
मिचेल स्टार्क बनला अॅशेसमध्ये १०० विकेट्स घेणारा १३ वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज!
अॅशेसच्या इतिहासात १०० विकेट्स घेणारा स्टार्क हा केवळ १३ वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आणि दोन्ही संघांमध्ये एकूण २१ वा गोलंदाज ठरला. त्याने २३ कसोटी सामन्यांमध्ये २६.७२ च्या सरासरीने ही कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात त्यांचे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडशिवाय प्रवेश केला. स्टार्कने गोलंदाजीच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली, जी त्याने उत्कृष्टपणे पार पाडली. आता हा सामना कुणाकडे झुकतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?
IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!

10 thoughts on “ENG vs AUS live: पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!”