IND vs NZ Team india visit mahakaleshwar temple, Ujjain: टीम इंडिया १८ जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. दोन्ही संघ इंदोर मध्ये पोहचले असून सराव देखील सुरु केला आहे.
सामन्याच्या एक दिवस अगोदर भारतीय क्रिकेटपटू बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहचले. १७ जानेवारी रोजी सकाळी विराट कोहली आणि कुलदीप यादव उज्जैनमध्ये महाकालेश्वर यांच्या भस्म आरतीमध्ये दिसले.
दोन्ही स्टार खेळाडूंनी सकाळी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगावर दिव्य भस्म आरतीत भाग घेतला. या दरम्यान, विराट कोहली मंदिरात डोके टेकवून प्रभूच्या भक्तीत मग्न दिसला. किंग कोहली नंदी महाराजांच्या मूर्तीजवळ बसला आणि मंत्रांचा जप ऐकला.

टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादव उज्जैनमध्ये सर्वकाळाचा विनाशक बाबा महाकाल यांचे दर्शन घेतल्यानंतर अत्यंत आनंदी दिसत होता. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की,
‘हा एक उत्तम अनुभव होता, संपूर्ण टीम माझ्यासोबत आली होती आणि अनेक क्रीडा कर्मचारीही उपस्थित होते, इथे येणे नेहमीच एक चांगला अनुभव असतो, मी पहिल्यांदाच येऊन जवळजवळ ९ वर्षे झाली आहेत. आणि इथे आल्याने मला खूप आनंद मिळतो.’
#WATCH | Madhya Pradesh | Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli, along with Kuldeep Yadav, offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. pic.twitter.com/GirLTB7j6I
— ANI (@ANI) January 16, 2026
IND vs NZ : शेवटचा एकदिवशीय सामना उद्या इंदोरमध्ये होणार.!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवशीय सामना उद्या इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी झालेले दोन्ही सामने दोन्ही संघाने प्रत्येकी एक असा जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे.
त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तोच संघ मालिका सुद्धा जिंकले. महत्वाचे म्हणजे न्यूझीलंडने गेल्या 12 वर्षांमध्ये एकदाही भारतात एकदिवशीय सिरीज जिंकली नाहीये, त्यामुळे हा नकोसा विक्रम मोडण्याची उद्या त्यांना चांगली संधी असणार आहे.
हेही वाचा: