IND vs OMAN: २०२५ चा आशिया कप सध्या जबरदस्त रंगात आहे . गट टप्प्यात सलग दोन सामने जिंकून भारताने सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे. तर आज त्यांचा सामना ओमानविरुद्ध होणार आहे. तसे पहिले तर या सामण्याने सुपर 4 संघात काहीही फरक पडणार नाही, कारण सुपर ४ संघ आधीच निच्छित झाले आहेत.
तरीही, टी-२० इतिहासात टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. आज, टीम इंडिया अशी कामगिरी करेल जी, फक्त पाकिस्ताननेच केली आहे. हा टप्पा गाठणारा भारत दुसरा संघ ठरेल.
खरं तर, ओमानविरुद्ध, भारतीय संघ आपला २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यापूर्वी ही कामगिरी पाकिस्तानने केली होती, ज्यांनी आतापर्यंत २७५ टी२० सामने खेळले आहेत. आता, भारत २५० चा टप्पा ओलांडणारा दुसरा संघ बनेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी होईल.
IND vs OMAN: भारतीय संघाचा कसा आहे टी-२० विक्रम ?
२००६ मध्ये पहिला टी२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियाने आतापर्यंत २४९ सामने खेळले आहेत, त्यापैकी १६६ जिंकले आहेत आणि ७१ गमावले आहेत. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत. टीम इंडियाचा विजयाचा टक्का ६६.६६ आहे.
भारतीय क्रिकेट संघाने वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली पहिला टी२० सामना खेळला. २००६ मध्ये त्याची सुरुवात विजयाने झाली. त्यानंतर ५० वा सामना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला गेला. १०० वा आणि १५० वा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला गेला. हार्दिक पंड्याने २०० व्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले. आता, सूर्या २५० व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे.
IND vs OMAN: सूर्यकुमार यादवसाठीही हा सामना खास
सूर्यकुमार यादवच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीतील हा २५ वा सामना असेल. आतापर्यंत त्याने २४ सामने नेतृत्व केले आहे, त्यापैकी १९ जिंकले आणि ४ गमावले. एक सामना बरोबरीत सुटला. त्याच्या नेतृत्वाखाली सूर्याने २४ सामन्यांमध्ये ६१२ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.
आज तो भारताला विजय मिळवून देऊ शकतो का? हे पाहणे मनोरंजक असेल. तथापि, ओमानसारख्या कमकुवत संघाचा सामना करताना टीम इंडियाचा विजय जवळजवळ निश्चित आहे.
हेही वाचा:
is Katrina Kaif Pregnant? कतरिना कैफ लवकरच बनणार आई? विकीच्या घरात हलणार लवकरच पाळणा..
1 Comment
Pingback: Team India Tour of Ireland: Team india conducted short T20 tours of Ireland in 2026 - t20sports.in