IND vs PAK: आज, ACC आशिया कप २०२५ मध्ये, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK)चे संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी बऱ्याच काळापासून तयारी करत आहेत.
हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघावर खूप दबाव असणार आहे. तरुण खेळाडूंनी भरलेल्या टीम इंडियाला आपला सन्मान राखण्यासाठी जिंकावे लागेल. दुसरीकडे, पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीही शिल्लक नाही. अशा परिस्थितीतच आता टीम इंडियाच्या प्लेईंग 11 बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. नक्की काय आहे हे अपडेट जाणून घेऊया सविस्तर ..!
IND vs PAK: टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये होणार बदल?
UAE विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळलेले ११ खेळाडू देखील पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरतील का? सध्या हा प्रश्न खूप मोठा झाला आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत, भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी याचे उत्तर दिले आहे. T20 Sports च्या प्रश्नाला उत्तर देताना रायन म्हणाले,
‘प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे.’ प्रशिक्षकांच्या या विधानानंतर, दुखापतीनंतरच प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल होईल हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. जर सामना सुरू होईपर्यंत सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील, तर गेल्या सामन्यातील तेच प्लेइंग ११ पाकिस्तानविरुद्ध खेळतील.
ENG vs SA: “हे अविश्वसनीय..” 300 धावा पार केल्यानंतर जॉस बटलरचे मोठे वक्तव्य.. भावूक होत म्हणाला..!
IND vs PAK: अर्शदीप सिंगला संधी मिळणे कठीन?
गेल्या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागू शकते. त्याच वेळी, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आता पुन्हा शिवम दुबेच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवावा लागेल.
दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार आणि प्रशिक्षकांना पुन्हा एकदा अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या त्रिकुटावर विश्वास ठेवावा लागेल. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला हार्दिक पंड्याची साथ मिळेल.
IND vs PAK: कधी खेळवला जाणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना?
भारत आणि प पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला दुबईच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे . भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ठीक 8 वाजता सुरु होईल. प्रेक्षक सोनी लिव्ह आणि सोनी स्पोर्ट्स नेट वर्क वर या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकतात..
हेही वाचा:
- Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!
- Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!
1 Comment
Pingback: IND vs PAK Match Revenue: भारत-पाकिस्तान सामन्यातून बिसीसीआयला मिळणार एवढे कोटी, आकडा वाचून व्हाल चकित..! - yuvakatta.com