IND vs PAK Match Revenue: आशिया कप २०२५ मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे, जगभरातील चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर असणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात जेव्हा जेव्हा सामना खेळला जातो तेव्हा स्टेडियम देखील खचाखच भरलेले असते. अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान जाहिरातींसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा असते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा बीसीसीआय-पीसीबी ते आयसीसी पर्यंत भरपूर उत्पन्न मिळते. या सामन्यादरम्यानही असेच काहीसे दिसून येणार आहे. या एका सामन्यातून बीसीसीआयला किती रक्कम मिळणार? एक नजर टाकूया..!
IND vs PAK Match Revenue: भारत-पाकिस्तान सामन्यातून बिसीसीआयला मिळणार एवढे कोटी!
यावेळी आशिया कप सामन्यांचे हक्क सोनीकडे आहेत. त्यामुळे सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जात आहे आणि सोनी लिव्ह अॅपवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. कोट्यवधी चाहते टेलिव्हिजनपासून मोबाईलपर्यंत हा सामना पाहतात.
Cricket has rivalries. This one defines them all. 🔥
Don’t miss #INDvPAK tonight at 7 PM, only on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/nJ3X0Nwv1v
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK)यांच्यातील आशिया कप २०२५ च्या सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी कंपन्या १६ लाख रुपयांपर्यंत खर्च करत आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांमधून झाली एवढी कमाई (IND vs PAK Match Ticket Revenue)
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या सामन्याच्या तिकिटांची किंमत ११,३९० ते १२,५८९ रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जेव्हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होईल तेव्हा सामन्याच्या तिकिटांमधून सुमारे १०० कोटी रुपये मिळणार आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्याला खूप विरोध होत आहे. अनेक भारतीय चाहते या सामन्यावर बहिष्कार घालत आहेत, त्याचे कारण पहलगाम दहशतवादी हल्ला आहे. जो आजपर्यंत कोणताही भारतीय विसरू शकलेला नाही. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तरीसुद्धा बीसीसीआयने सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे ..
हेही वाचा:
- Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!
- Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!
1 Comment
Pingback: IND vs PAK Head to Head: भारत और पाकिस्तान मै कोण है तगडा?, पिछले 5 मुकाबले मै कोण कीस पर पडा भारी? - t20sports.in