IND vs PAK: १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात टी२० विश्वचषक २०२६ चा सामना खेळवला जाणार आहे. आयसीसीने टी२० विश्वचषकाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मात्र क्रिकेट रसीकांसाठी आणखी एक मोठी मेजवानी विश्वचषकाच्या आधीच येणार आहे.. टी२० विश्वचषक २०२६ च्या आधी, क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात एक भव्य सामना खेळवला जाईल. ज्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.नक्की कधी आहे हा सामना जाणून घेऊया सविस्तर .!
IND vs PAK: टी-२० विश्वचषकाच्या आधी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना!
२०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी, भारत आणि पाकिस्तान अंडर-१९ आशिया कपमध्ये एकमेकांसमोर येतील. आगामी अंडर-१९ आशिया कप २०२५ एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाईल. भारतीय संघ या स्पर्धेत १२ डिसेंबर रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. IND vs SA: टिम इंडियाच्या नावावर नकोसा डाग, दक्षिण आफ्रिकेने अक्षरशा लोळवले; 20 वर्षांत पहिल्यांदाच झाला एवढा नकोसा अपमान.!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ डिसेंबर रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत भारतीय संघ एकूण तीन लीग स्टेज सामने खेळेल. बीसीसीआयने टीम इंडियाचीही घोषणा केली आहे. वैभव सूर्यवंशीचीही निवड करण्यात आली आहे, परंतु आयुष म्हात्रे संघाचे नेतृत्व करेल.

अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघ (Team india U-19 squad for Asia cup 2025)
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, नमन पुष्पक, डी. दिपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, उद्धव जॉर्ज, मो.
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?