IND vs SA 2nd Test Live: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे सुरू आहे. हा सामना खास आहे कारण, कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्र ब्रेकचे नियम बदलले जात आहेत.
पहिल्या सत्रानंतर नेहमीच लंच ब्रेक आणि त्यानंतर चहापान होते. गुवाहाटी कसोटीत मोठा बदल झाला आहे, ज्यामध्ये पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चहापानाचा ब्रेक होता. अनेकांना प्रश्न पडेल की? आयसीसीने या कसोटी सामन्यासाठी जुना नियम का मोडला. का पहिल्या सेशन नंतर लंच ब्रेक एवजी टी-ब्रेक ठेवण्यात आला आहे? चला तर जाणून घेऊया..

IND vs SA 2nd Test Live: दुसऱ्या कसोटीत लंचपूर्वी चहापान का होत आहे?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे, परंतु दुसरा कसोटी सामना नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधी सकाळी ९ वाजता सुरू झाला. पहिले सत्र सकाळी ११ वाजता संपेल आणि २० मिनिटांचा चहापानाचा ब्रेक असेल. गुवाहाटीमध्ये सूर्य लवकर उगवतो आणि दिवस लवकर मावळतो हे लक्षात घेण्यासारखे आहे.
दुपारी ४ वाजल्यापासून अंधार पडू लागतो आणि त्यामुळे खेळाडूंना खेळणे कठीण होऊ शकते. म्हणूनच सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला. वेळेत बदल झाल्यानंतर, आयसीसीला वाटले की सकाळी ११ वाजताचे जेवण खेळाडूंसाठी थोडे लवकर असेल. म्हणून, त्यांनी जेवण दुपारी १:२० वाजता बदलले आहे आणि चहापान सकाळी ११ वाजता असेल.

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत सत्राची वेळ कशी असेल?
- पहिले सत्र: सकाळी 9:00 ते 11:00
- चहा ब्रेक: सकाळी 11:00 ते 11:20 (20 मिनिटे)
- दुसरे सत्र: सकाळी 11:20 ते 1:20
लंच ब्रेक: दुपारी 1:20 ते 2:00 (40 मिनिटे) - तिसरे सत्र: दुपारी 2:00 ते 4:00
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?