IND VS SA 2nd Test: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल (Subhman Gill) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापती मधून रिकव्हर न झाल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे आणि तो मुंबईला रवाना झाला आहे.

IND VS SA 2nd Test: संघासोबत प्रवास करूनही शुभमन अखेर अनफिट?
याआधी कोलकता कसोटीमध्ये गिल दुखापतीमुळे चालू सामन्यातून बाहेर झाला होता. ज्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होताच शुभमन पुन्हा टीम इंडियासोबत हॉटेल्समध्ये आला होता. आणि संघासोबत च त्याने गुवाहटीपर्यंत प्रवास देखील केला.
मात्र आज कसोटीच्या एक दिवस आधी त्याची पुन्हा तपासणी केली असता तो सामना खेळण्यास फिट नसल्याचे दिसून आले. ज्यामुळे त्याला आराम दिला गेला आहे.
शुभमन गिलला दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्याला संघातूनही बाहेर काढण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना गिलच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
एमआरआय केल्यानंतर गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमनच्या दुखापतीचे पूर्ण प्रमाण अद्याप कळलेले नाही. आता गिलच्या अनुस्पस्थितीमध्ये उद्या कोण टीम इंडियाचे नेतृत्व करणार, हे बीसीसीआय लवकरच कळवेल .
📌Official Statement: Shubhman Gill has been ruled out of the 2nd test of the #indvssa Test series! pic.twitter.com/hVqXSk12VE
— Kishan (@Kisna_Kusale) November 21, 2025
IND VS SA मालिकेत टीम इंडिया ०-१ ने पिछाडीवर !
पहिल्या कसोटीत भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. विशेषतः फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर हार मानली. १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ फक्त ९३ धावांवर बाद झाला. तीन फलंदाज आपले खाते उघडू शकले नाहीत, तर सहा जण दुहेरी आकडी गाठू शकले नाहीत.

म्हणूनच संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीत त्यांच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल. पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि पंत हे सर्वजण फॉर्ममध्ये नव्हते. आता दुसऱ्या कसोटीमध्ये तरी टीम इंडिया चांगली कामगिरी करून मालिका बरोबरीत सोडवतील, असी आशा चाहत्यांना आहे..
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या (22 नोव्हेंबर) रोजी गुवाहटीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?
