IND vs SA 2nd test: गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार चमत्कारच.!, इतिहासात भारत कधीही करू शकली नाहीये एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग.!

IND vs SA 2nd test:  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड आहे आणि टीम इंडियाला पराभवाचा धोका आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर, आफ्रिकन संघाकडे 314 धावांची आघाडी आहे आणि चौथ्या दिवशी ही आघाडी 400 पेक्षा जास्त वाढली आहे.

 IND vs SA 2nd Test Live: आयसीसीने पहिल्यांदाच मोडला 148 वर्षापासून चालत आलेला नियम? गुवाहटी कसोटीमध्ये का आणण्यात आला टी- ब्रेक?

अशा परिस्थितीत, टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी एका चमत्काराची आवश्यकता असेल. भारतीय संघाला कसोटी इतिहासात कधीही न साध्य झालेला पराक्रम करावा लागेल.कारण भारतीय संघाने आतापर्यंत कधीही भारतात 400 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत कसोटी जिंकला नाहीये.

IND vs SA 2nd test:  गुवाहटी कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला करावी ल  लागणार मेहनत.!

खरं तर, भारतात कोणताही संघ कधीही 400 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठू शकलेला नाही.  भारतीय मैदानांवर चौथ्या डावात खेळपट्टी इतकी कठीण होते की, 150 धावांचे लक्ष्यही कठीण होते.

Image

भारतीय कसोटी इतिहासात, 300+ चे लक्ष्य फक्त एकदाच पाठलाग केले गेले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाठलाग करताना भारतीय संघाने कधीही 250 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. अश्या स्थितीमध्ये दक्षिण आफ्रिका याआधीच 400 धावांच्या वर लीड असून आजूनही ते फलंदाजी करत आहेत. भारतीय संघाच्या आजच्या लंच पर्यंत 450 धावा करून 450+ चे लक्ष देण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्लान असेल.

ज्यामुळे 400+ धावांचा यशस्वी पाठलाग करून टीम इंडिया हा सामना जिंकू शकले का ? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे..घरच्या मैदानावर आणि २१ व्या शतकात भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी धावांचा पाठलाग ३८७ धावांचा आहे.

२००८ मध्ये, चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ३८७ धावांचे लक्ष्य गाठले. त्यामुळे, गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी ऋषभ पंतच्या संघाला चमत्काराची आवश्यकता असेल.

IND vs SA 2nd test: गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला करावा लागणार चमत्कारच.!, इतिहासात भारत कधीही  करू शकली नाहीये एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग.!

भारतातील कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग

  • ३८७/४ – भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई (२००८)
  • २७६/५ – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, दिल्ली (१९८७)
  • २७६/५ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली (२०११)
  • २६२/५ – भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू (२०१२)
  • २५६/८ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रेबॉर्न (२०१०)

दुसऱ्या कसोटी सामन्याची स्थिती (IND vs SA 2nd test Updates)

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सेनुरन मुथुस्वामीच्या शतकाच्या आणि मार्को जॅनसेनच्या ९३ धावांच्या खेळीच्या मदतीने ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारताचा पहिला डाव फक्त २०१ धावांवर संपुष्टात आला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला २८८ धावांची मोठी आघाडी मिळाली.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६/० धावा केल्या होत्या आणि एकूण ३१४ धावांची आघाडी घेतली होती. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, गुवाहाटीतील पराभव म्हणजे मालिकेत क्लीन स्वीप होईल, जे टीम इंडिया नक्कीच टाळू इच्छित असेल.


हेही वाचा:

ENG vs AUS live: पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!

Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?

Leave a Comment

error: