IND vs SA live: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कोलकाता कसोटी सामन्यात यजमान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतीय संघ आज चांगली फलंदाजी करून संघाला समोर घेऊन जाईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र खेळ सुरु झाला तेव्हापासूनच टीम इंडियाला एकामागे एक धक्के बसायला सुरवात झाली..

IND vs SA live: शुभमन गिल ने का सोडले मैदान?
आधी वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा वॉशिंग्टन सुंदर बाद झाला तेव्हा भारतीय कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी आला.
गिलने ३ चेंडूत ४ धावा काढल्या आणि रिटायर्ड हर्ट झाला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार गिलच्या दुखापतीमुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर गिलची फलंदाजीची कामगिरी महत्त्वाची आहे.
Shubman Gill Retired hurt after feeling strain in neck #ShubmanGill #INdvsSA #SAvsIND #INDvSA #SAvIND pic.twitter.com/JYvL4FhODN
— GyanGainer (@techind34820937) November 15, 2025
शुभमन रिटायर्ड हर्ट झाला असला तरी तो पुन्हा फलंदाजीस येण्याची शक्यता कमी दर्शवली जात आहे. कारण त्याला Cramp आल्याच्या कारणाने फिजीओने आराम करण्याचा सल्ला दिल्याचे समोर आले आहे.. आता जर भारतीय संघ आणखी अडचणीमध्ये सापडला तर कर्णधार शुभमन फलंदाजीस येतो का नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे..

IND vs SA live Updates
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा टीम इंडियाच्या 138 धावा बोर्डवर लागल्या असून 4 गडी बाद झाले आहेत. लंच नंतर पुन्हा खेळ सुरु होईल तेव्हा रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल खेळपट्टीवर पुन्हा येतील .. जडेजा 11 धावा काढून तर जुरेल 5 धावा करून नाबाद आहेत..
हेही वाचा:
IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!