IND vs SA live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून गुवाहटीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याआधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे तर टीम इंडियाचे नेतृत्व रिषभ पंतकडे देण्यात आले आहे.. या लाइव्ह फीड अपडेट्स मध्ये तुम्ही सामन्याचे वेळोवेळी ताजे अपडेट वाचू शकता..

IND vs SA live Updates, Newest First!
Day 4 ,11:05 Am: दक्षिण आफ्रिकेने १०० धावांचा टप्पा ओलांडला, 400 धावांची आघाडी निच्छित!
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ३९ षटकांनंतर त्यांनी ३ गडी गमावत १०४ धावा केल्या आहेत. यासह, त्यांची आघाडी आता ३९२ धावांपर्यंत वाढली आहे.
09:00 AM* : गुवाहटीच्या मैदानावर दुसऱ्या कसोटीला सुरवात, दक्षिण आफ्रिकेचे ओपनर मैदानावर..!
गुवाहटीच्या मैदानावर सामन्याला सुरवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर इडन मार्करम आणि रायन रिकलटन मैदानावर उतरले आहेत..
8:47 AM: दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 जाहीर.!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी दिवस पहिला लाईव्ह: ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग ११
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जियोर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टिरक्षक), मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी दिवस पहिला लाईव्ह: टीम इंडियाची प्लेइंग ११
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक आणि कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
8:43 AM: दक्षिण आफ्रिकेने जिंकले नाणेफेक, प्रथम फलंदाजीचा निर्णय!
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकले असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करून पाहुण्यांना शक्य तेवढ्या कमी धावांत रोखण्यासाठी प्रयत्न करेल..
8:11 AM: आज रंगनार दुसरा कसोटी सामना , 9वाजता होणार सामन्याला सुरवात !
भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ठीक 9 वाजता सुरु होणार असून त्याआधी अर्धा तास अगोदर नाणेफेक होईल. मैदानाची खेळपट्टी लक्षात घेता कोणताही संघ प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्यास उत्सुक असेल..
7:49 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: आजच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग ११ (IND vs SA 2d test probable playing 11)
भारताचा अंदाजित संघ: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिकेचा अंदाजित संघ: रायन रिकेल्टन, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश/लुंगी एनगिडी, सायमन हार्मर, केशव महाराज
हेही वाचा:
Ashes 2025: मिचेल स्टार्क तोडणार रवी अश्विनचा मोठा विक्रम, पहिल्याच कसोटीमध्ये रचणार इतिहास ?