IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!

IND vs SA live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकत्ताच्या स्टेडियम वर खेळवला जात आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि पाच बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा क्रम मोडून काढला.

IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!

मात्र यादरम्यान बूमराह ने अशी एक गोष्ट बोलली ज्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज झाले आणि अशीही शक्यता दर्शवली जात होती की, दक्षिण आफ्रिका त्याची तक्रार करतील  आणि बूमराहवर कारवाई होईल.. नक्की काय होईल प्रकरण? जाणून घेऊया .

IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराह वर होऊ स  शकली असती कारवाई?

सामन्यादरम्यान डीआरएस कॉल दरम्यान बुमराहने ऋषभ पंतशी बोलताना “बौना” हा शब्द वापरला. बुमराहने रिषभ पंतची बोलतांना स्टंप माईक मध्ये हा शब्द पकडला गेला. त्याच्या लहान उंचीमुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांच्यावर हा हल्ला मानला जात होता. 

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास..! कमी वयात देशासाठी अशी कामगिरी करणारा ठरला सर्वांत युवा खेळाडू..!

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक अश्वेल प्रिन्स यांनी भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यातील स्टंप माइकवरील संभाषण कमी लेखले आहे.

 

IND vs SA live Updates: दक्षिण आफ्रिका तक्रार करणार नाही, बूमराहला दिलासा !

या सर्व गोष्टीवर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक म्हणाले की

, ईडन गार्डन्स येथे पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान घडलेल्या घटनेवर आम्ही चर्चा  किंवा तक्रार करणार नाही. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही वादावादी झाली, जेव्हा टेम्बा बावुमाविरुद्ध बुमराहचा एलबीडब्ल्यू अपील फेटाळण्यात आला. डीआरएस घ्यावा की नाही याबद्दल चर्चेदरम्यान, बुमराह स्टंप माइकवर असे म्हणत ऐकू आला, “तो देखील बटू आहे.” बावुमाच्या उंचीबद्दल हे एक टोमणे म्हणून समजले जात आहे.

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या चर्चेदरम्यान फलंदाजी प्रशिक्षक अ‍ॅशवेल प्रिन्स यांनी संघाला अशा कोणत्याही वादापासून दूर ठेवले. ते म्हणाले,

“नाही, कोणतीही चर्चा होणार नाही. हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले आहे. मला वाटत नाही की क्रीजवर जे घडले ते मुद्दाम केले गेले असे नाहीये. त्यामुळे हा विषय आम्ही सोडून दिलाय.

 

IND vs SA live Updates: बुमराहच्या त्या शब्दावर मात्र चाहते नाराज ! 

पावळ्याला झालेल्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेम्बा बावुमाची कामगिरी निराशाजनक होती आणि कुलदीप यादवने त्यांना तीन धावांवर बाद केले. “बटू” हा हिंदी शब्द सामान्यतः बटूत्व असलेल्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, परंतु लहान उंचीच्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी त्याचा वापर करणे आक्षेपार्ह मानले जाऊ शकते.

IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!

क्रिकेट चाहते देखील या शब्दामुळे संतापले आहेत. IND विरुद्ध SA सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आफ्रिकन फलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध निष्प्रभ ठरले आणि संपूर्ण संघ फक्त १५९ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या, पाच विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


हेही वाचा:

IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!

IPL 2026 Trade: संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात तर, जडडू झाला राजस्थानी; पहा आयपीएल 2026 संपूर्ण ट्रेड!

1 thought on “IND vs SA live Updates: जसप्रीत बूमराहच्या त्या टिप्पणीवर दक्षिण आफ्रिका करणार नाही तक्रार, मोठा विवाद टळला..!”

Leave a Comment

error: