IND vs UAE: 18 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन, 4 बळी घेत या गोलंदाजाने जिंकला सामनावीर पुरस्कार ..!

  IND vs UAE: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) मध्ये टीम इंडियाने UAE ला हरवून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर UAE चे फलंदाज काहीही करू शकले नाहीत. भारतीय संघाच्या शानदार गोलंदाजीपुढे UAE संघ फक्त १३.१ षटकातच कोसळला.

या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूला जवळजवळ दीड वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली आणि या खेळाडूने शानदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

 IND vs UAE: कुलदीप यादव ठरला सामनावीर!

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला बऱ्याच काळानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. यापूर्वी कुलदीपची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघातही निवड झाली होती, परंतु त्याला एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

त्यानंतर आशिया कपपूर्वी, कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकेल का? हा मोठा प्रश्न होता आणि UAE विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता, जो या गोलंदाजानेही खरा ठरला.

IND vs UAE: 18 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन, 4 बळी घेत या गोलंदाजाने जिंकला सामनावीर पुरस्कार ..!

 IND vs UAE:कुलदीप यादवने घेतले 4 महत्वाचे विकेट! 

कुलदीप यादवने आपल्या अद्भुत गोलंदाजीने यूएईविरुद्ध धुमाकूळ घातला. या सामन्यात गोलंदाजी करताना कुलदीप यादवने २.१ षटकात फक्त ७ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले. या सामन्यात कुलदीपने यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीम, राहुल चोप्रा, हर्षित कौशिक आणि हैदर अली यांचे बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुलदीप यादवला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

UAE वर विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाचा पुढील सामना 14 सप्टेबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईच्या मैदानावर  खेळवला जाणार आहे.


हेही वाचा:

Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!

 Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!

Leave a Comment

error: