is Katrina Kaif Pregnant? : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री सध्या आईत्वाचा आनंद घेत आहेत. आधी अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhatt) मुलगी रियाची आई बनली त्यांनतर दीपिका पदुकोण Dipika Padukone) ने नुकतीच मुलगी दुआचे स्वागत केले आहे आणि नंतर कियारा अडवाणी (Kiara Adwani) देखील आई झाली आहे.
यांनतर आता पुन्हा एकदा बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्री आई बनत असल्याचे समोर आले आहे.आता बातम्या येत आहेत की, कतरिना कैफ (Katrina Kaif)चे नावही या यादीत जोडले जाणार आहे. ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटापासून कतरिना बॉलीवूड मधून गायब आहे.. ज्याचे कारण आता समोर आले आहे.
गरोदरपनामुळे कतरिना कैफ कामापासून दूर? (is Katrina Kaif Pregnant? 🙂
विकी कौशलची पत्नी या वर्षी ती क्वचितच कुठेही दिसली आहे. काही काळापूर्वी विमानतळावर तिचे फोटो समोर आले तेव्हापासून तिच्या गरोदरपणाच्या अफवा चांगल्याच वाढल्या आहेत
इतर कलाकार सतत चित्रपटांमध्ये व्यस्त असताना, कतरिनाच्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टची बातमी नाही. तिचे नाव फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाशी जोडले गेले होते, परंतु सध्या ती त्याचा भाग आहे की नाही हे स्पष्ट नाही. त्याच वेळी, विकी कौशल सलग अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे आता पुन्हा तोच प्रश्न समोर येतोय की, खरच गरोदर असल्यामुळे कतरिना कामापासून दूर आहे का?
View this post on Instagram
कतरिना खरोखर आई होणार आहे का? (is Katrina Kaif Pregnant? )
एका न्यूज वेबसाइटने दावा केला आहे की, कतरिना कैफ गर्भवती आहे आणि हे जोडपे लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. असे म्हटले जात आहे की, विकी-कॅटरीना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत पालक होऊ शकतात.मात्र अद्याप दोघांकडूनही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
काही महिन्यांपूर्वी, जेव्हा विकी कौशलला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता की, ‘जेव्हाही आपल्याला आनंदाची बातमी सांगायची असेल तेव्हा आम्ही ती नक्कीच करू. सध्या या बातमीत काहीही तथ्य नाही.’
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे झाले. आता लग्नाच्या सुमारे चार वर्षांनंतर, जर ही बातमी खरी ठरली, तर लवकरच त्यांच्या दोन्ही घरात एका छोट्या पाहुण्यासारखे हास्य घुमेल.
हेही वाचा:
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
1 Comment
Pingback: SL vs AFG: चालू सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूवर कोसळला दुखाचा डोंगर, या खेळाडूच्या वडिलांचे झा