
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
कर्नाटकच्या या मुस्लीम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी चक्क 80 लाख रुपयांची जमीन दान केलीय..!
कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळूर शहरात हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी एका मुस्लीम व्यवसायीकाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळपासूनच सोशल मिडीयावर त्यांचीच चर्चा चालू आहे. एव्हढेच नव्हे तर या मुस्लीम व्यक्तीचे पोस्टर मंदिर प्रशासनाने मंदिरात लावले आहेत.
काही लोकं धर्माच्या नावाखाली हिंसा पसरवतात तर काहि जन याला अपवाद ठरून, हिंदू मुस्लीम भाई भाई या विधानाला साक्षात खरे करताना दिसतात. आज अशाच एका मुस्लीम बांधवाबद्दल जाणून घेऊ ज्यांनी अक्षरशः आपली 80 लाख रुपयांची जमीन हि हनुमान मंदिर बनवण्यासाठी दान केली आहे.
बंगळूर शहराजवळील कडूगोडी भागात राहणाऱ्या ६५ वर्षीय HMG पाशा हे कार्गोचा व्यवसाय करतात त्यांनी आपली जमीन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दान केली आहे. वालागेपुरा परिसरात हायवे जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या बाजूला HMG पाशा यांची ३ एकर जमीन आहे.
Karnataka: HMG Basha, a resident of Kadugodi in Bengaluru donated land for construction of a Hanuman Temple in Mylapura.
He says, "I used to see many people struggle while offering prayers as the temple is small. So, I decided to donate a part of my plot of land." pic.twitter.com/JaxR2DJaAv
— ANI (@ANI) December 8, 2020
मंदिराचे कार्यकारणी मंडळ मागील काही दिवसांपासून मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार करण्याचा विचार करत होते. परंतु मंदिराची जमीन हि लहान असल्यामुळे त्यांची हि योजना थांबली होती.
हनुमान मंदिरासाठी दान केलेल्या जमिनीची आजची किंमत 80 लाख रुपये. मंदिर प्रशासनाने HMG पाशा यांच्याकडे १००० चौरस फुट जमिनीची मागणी केली होती. परंतु पाशा यांनी मंदिराला १६०० चौरस फुट जमीन दान म्हणून दिली आहे.
हि जमीन हायवेला लागून असल्यामुळे तिची किंमत 80 लाख रुपये एव्हढी आहे. HMG पाशा यांच्या उदारपणाला बघून सर्वजन त्यांचे कौतुक करत आहेत तर काही जनांनी त्यांचे पोस्टर लावले आहे.
जमीन दान करण्याबाबत HMG पाशा म्हणतात कि. मंदिराला प्रदक्षिणा घालताना महिलांना परेशानी होत असल्याचे मी अनेक वेळा बघितले होते. सहा महिन्यांपूर्वी जेंव्हा गावकऱ्यांनी मला मंदिरविस्ताराबद्दल सांगितले तेंव्हा मी न विचार करता माझ्या जमिनीचा एक लहानसा भाग दान करण्याचे ठरवले जेणेकरून कोणालाही मंदिरात पूजा पाठ करण्यासाठी समस्या होऊ नये.
हिंदू मुस्लीम एकतेचे आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण HMG पाशा यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच सध्या ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..