‘किम जोंग’च्या मते पृथ्वीवर कोरोना पसरण्यास चीन नाय तर परग्रहावरील ऐलियन्स जबाबदार आहेत..

कोरोनाच्या बाबतीत ‘किम जोंग’ यांनी केलेला दावा ऐकून सगळ्यांचाच फ्युजा उडाल्यात…


जगभरात कोरोनाने आधीच धुमाकूळ घातला आहे. मागीत तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे. जगभरात दररोज लाखो नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र कोरोना व्हायरस कसा आणि कुठून आला याबाबत आतापर्यंत ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा जगभरात होत आहे.

किम जोंग उन यांनी म्हटलं की, जगात कोरोना व्हायरस परग्रहावरील ऐलियन्सने पृथ्वीवर पसरवला आहे. उत्तर कोरियातील पहिला रुग्ण देखील ऐलियन्समुळेच सापडला. किम जोंग यांनी दावा केली की, दक्षिण कोरियाच्या सीमेवरून ऐलियन्सने फुग्यांमध्ये व्हायरस भरून आमच्याकडे फेकला. त्यानंतरच देशात कोरोना व्हायरस पसरला.

दरम्यान उत्तर कोरियात याआधीच एक अफवा पसरलेली आहे. ज्यानुसार एप्रिलमध्ये एका 18 वर्षीय सैनिक आणि पाच वर्षाच्या मुलाने ऐलियन्स सदृश्य व्यक्तीला स्पर्श केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले आणि उत्तर कोरियात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली.

कोरोना

उत्तर कोरियाचा शेजारी देश दक्षिण कोरियाने ऐलियन्सने कोरोना पसरविल्याचा दावा फेटाळून लावला हे निर्धार असल्याचं म्हटलं. यावर सियोल विद्यापीठाचे प्रोफेसर यांच्यानुसार किम जोंग यांच्या दाव्यावर म्हटलं की, वस्तूंच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे किम जोंग याच्या दाव्यावर विश्वास ठेवणं कठिण आहे.

उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA नुसार, सरकारने सीमेला लागून असलेल्या भागांसाठी काही सूचना दिल्या आहेत. यानुसार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांनी हवेतून येणारे फुगे किंवा एलियन सारख्या गोष्टींपासून सावध राहावे. असा प्रकार कोणाला दिसल्यास पोलिसांना कळवा.असे आदेशच त्यांनी पारित केले आहेत.

आता किम जॉन यांच्या या दाव्यात किती सत्यता आहे हेसांगण जरा कठीणच आहे..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top