सध्या महाराष्ट्रभर एकचं गोष्ट जोरात चर्चेत आहे ती म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी. ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी चक्क आपल्याच पक्षाविरुद्ध बंड पुकारला आहे. कालपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 40 आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत.राष्ट्रवादी आणि ‘काँग्रेस सोबतचं सरकार आम्हाला मान्य नाही,त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन करा’ अशी अटच आता एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवलीयं.
एकंदरीत काय तर दोन दिवसापासून महाविकास आघाडीचं सरकार व्हेंटिलेटरवर आहे असंच म्हणायला हवं.
बरं,शिवसेनेमध्ये राहून त्यांच्याविरुद्ध बंड करणारे शिंदे एकटेच नाहीत.याआधीही शिवसेनेच्या अगदी जवळच्या नेत्यांनीच त्यांच्याविरुद्ध बंड केलंयं.
आजपर्यंत या नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केलंय..
1 )राज ठाकरे : शिवसेनेला धक्का देणाऱ्यांत सर्वांत पाहिलं नाव येत ते म्हणजे ‘राज ठाकरे ‘. राज ठाकरेंचं शिवसेना सोडणं हे केवळ शिवसेनेलाच नाही तर ठाकरे कुटुंबीयांना देखील महागात पडलंयं
आजवरचं राजकारण पाहता तरी असंच दिसतंय.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांच्यावर विद्यार्थी प्रमुख ही जिम्मेदारी सोपावली होती..राज ठाकरे यांनीही ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत पक्षासाठी अनेक महत्वाची काम केली.
महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि राज ठाकरे शिवसेनेपासून दुरावात गेले.शेवटी 2005मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली,आणि मार्च 2006मध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची स्थापना केली. राज ठाकरेसोबतच शिवसेनेतील अनेक निष्ठावंतानीही त्यावेळी शिवसेना सोडलेली..
2)नारायण राणे: शिवसेनेविरुद्ध बंड करून शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांच्या यादीत दुसरं नाव येतं ते नारायण राणे यांचं. बाळासाहेबांच्या अतिशय मार्जितील नेते म्हणून नारायण राणे ओळखल्या जायचे..
चेंबूरचे शाखाप्रमुख ते युतीचे मुख्यमंत्री एवढा प्रवास राणेनी बाळासाहेबांसोबत केला. नारायण राणेनी शिवसेना सोडली याला करणही पुन्हा तेच ठरलं. ते म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कार्याध्यक्षपदी केलली निवड..
येथूनच राणेना आपल्याला पक्षात दुय्यम वागणूक दिली जातेय याचा अनुभव आला.शेवटी राणेनीही 2005मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला रामराम ठोकला.
3)भास्कर जाधव : भास्कर जाधव हे ना मातोश्रीच्या अत्यंत विश्वासु नावांपैकी एक. त्याच जाधवांना मातोश्रीबाहेर ताटकळतं बसायला लागल्यामुळे नाराज होऊन जाधवानीं शिवसेना सोडली.
4) छगन भुजबळ : सध्याच्या महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ आधी शिसवसेनेचाचं हिस्सा होते.1985मध्ये पहिल्यांदा छगन भुजबळ शिवसेनेकडून मुबईचे महापौर झाले होते.बाळासाहेबांची त्यांच्यावर विशेष मदार होती.
शिवसेनेला धक्का तेव्हा बसला जेव्हा अंतर्गत वादामुळे भुजबळानी 1991 मध्ये शिवसेनेच्या 9 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळ यांच्या या पावलामुळे तेव्हा शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.
यांच्याशिवाय संजय निरूपम,बाळा नांदगावकर,सुरेश प्रभू यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय.
हें झालं आजवरच.. मात्र आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक यांनी उचललेलं पाऊल शिवसेनेला किती महागात पडतंय?हे वेळचं सांगेल.
तूर्तास तरी महाविकास आघाडी आणि शिवसेनेसमोर शिंदेच्या रुपानं मोठं संकट उभं ठाकलंय,हें मात्र नक्की..
हेही वाचा: