Maratha Reservation: मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षण ओबीसी तून मिळावे यासह अन्य मागण्यांसह जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरवात झाली आहे.
दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जरांगे सरकार उलथून लावणार आहेत. सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार खासदार सामील असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला. नांदेडचे खासदार चव्हाण यांनी देखील जरांगेंना लेखी पाठिंबा दिला आहे.
अजितदादांचे आमदार जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोप हाकेंनी केला.

आम्ही गावगड्यात 50 % आहोत. सगळे एकत्र झाले तर तुमचं काय होईल. तुम्ही obc आरक्षण संपवायला चालला आहात. अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही उद्या पुण्यात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार. आम्ही ओबीसी जोडो अभियान सुरु करू. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी,ओबीसी मंत्र्यांना ओबीसी माफ करणार नाहीत. लक्ष्मण हाकेंवर गुन्हा आणि जरांगेला रेड कार्पेट टाकण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा:
- Maratha Reservation: ‘महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा अपमान सहन करणार नाही, जरांगेना…’ चंद्रशेखर बावनकुळे जरांगेवर भडकले..!
- Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!
