ODI World Cup 2027 Venue: २०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2027 ) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आधीच तयारी सुरू केली आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा पुढील हंगाम २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाईल.
या मेगा इव्हेंटची तयारी लक्षात घेऊन, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या देशात सामने खेळवण्यासाठी स्टेडियमची निवड केली आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यासह एकूण ५४ सामने खेळवले जातील.

ODI World Cup 2027 Venue: या ठिकाणी खेळवले जाणार सामने .
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, ते एकूण ४४ सामने आयोजित करेल, याशिवाय उर्वरित १० सामने झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेने ४४ सामन्यांचे आयोजन करण्यासाठी आपल्या देशातील ८ स्टेडियम निवडले आहेत.
ज्यामध्ये वँडरर्स स्टेडियम, केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, डर्बनमधील किंग्जमीड क्रिकेट ग्राउंड, प्रिटोरियामधील सेंच्युरियन पार्क, ब्लोमफॉन्टेनमधील मंगाउंग ओव्हल, ग्केबेरामधील सेंट जॉर्ज पार्क, पूर्व लंडनमधील बफेलो पार्क आणि पार्लमधील बोलँड पार्क यांचा समावेश आहे.
या सर्व स्टेडियमना आतापासून तयारी सुरू करण्याचे कळवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने या मेगा स्पर्धेसाठी स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख म्हणून त्यांचे माजी अर्थमंत्री ट्रेवर मॅन्युएल यांची नियुक्ती केली आहे.
ODI Worldcup 2027 मध्ये एकूण १४ संघ होणार सहभागी .
दक्षिण आफ्रिकेने शेवटचे २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक सामने आयोजित केले होते. आता त्यांना २०२७ मध्ये यजमानपदाची संधी मिळाली आहे. या मेगा स्पर्धेत, यजमान देश म्हणून दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाचे स्थान आधीच निश्चित झाले असून, स्पर्धेत ऐकून एकूण १४ संघ स्पर्धेत सहभागी होतील.
या सर्व संघांना प्रत्येकी ७ च्या वेगवेगळ्या गटात विभागले जाईल, ज्यामध्ये प्रत्येक गटातील टॉप-३ संघांना सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळेल. यानंतर सेमीफायनल आणि फायनल होतील. या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत तीनवेळा एकदिवसीय विश्वचषक खेळवण्यात आला आहे जो १९९९ आणि २००३ आणि 2023 मध्ये होता.
हेही वाचा:
धनश्री वर्मानंतर तिच्या मैत्रिणीचा घटस्फोटासाठी अर्ज , नवऱ्यावर केले गंभीर आरोप..!
1 Comment
Pingback: Cheteshwar Pujara Announced Retirement: भावनिक पोस्ट लिहित चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला 'रामराम', अंतरराष्ट्रीय क्रि