राजमाता जिजाऊ यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात..

राजमाता जिजाऊ यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात..


‘पुणे तिथे काय उणे…!!!’ हे वाक्य जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात प्रसिद्ध असलेली प्रत्येक गोष्ट पुण्यामध्ये मिळते. अगदी सर्वच बाबतीत पुणेकर आपल्या शहराच्या बाबतीत माज करतात…

विद्येचे माहेरघर, आयटी हब, उद्योगजकांचे शार, खवय्येगिरांच पुणे अशी अनेक नावे पुण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र कधी विचार केला आहे का, पुणे शहराला इतके महत्त्व कधीपासून आणि कोणामुळे प्राप्त झाले?

पेशव्यांचे पुणे म्हणून सगळीकडे उदोउदो केला जातो. मात्र सोळाव्या शतकात जिजाऊंनी पुनवडी नावाच छोटस गाव वसवलं नसत तर, आज आपण पाहतोय ते इतकं विशाल ‘पुणे शहर’ उभच ठाकलं नसतं.

 

जहागीर म्हणून शहाजीराजांना आदिलशाहीकडून पुणे शहर मिळालेलं. शहाजीराजांनी किती दिवस शहाच्या चाकरी करायच्या म्हणून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न पुणे शहरातच करण्यात आला. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून आदिलशाहीने आपला सरदार मुरार जगदेव याला प्रचंड सैन्य देऊन शहाजीराजांची जागीर असलेल्या पुण्यावर धाडले होते…

मुरार जगदेवने पुण्यात प्रचंड लुटालूट केली. आख्ख पुणे जाळून बेचिराख केलं आणि कसब्यात गाढवाचा नांगर फिरवला. सुलतानाचा सैन्य निघून गेलं तेव्हा संपूर्ण गाव नष्ट झालं होतं.

मुरार जगदेवने जमिनीत खोचलेली एक पार त्यावर अडकवलेली चप्पल आणि फुटकी कवडी, एवढच काय ते शिल्लक होतं. याचा अर्थ आता गावात कोणीही राहायचं नाही, अथवा कोणीही कोणतेच पीक घ्यायचं नाही. उभ्या महाराष्ट्रासाठी ती काळरात्र ठरली.

 

हेही वाचा:दारूंच्या जगातील बिग ब्रदर असलेल्या पटियाला पेगने प्रसिद्ध व्हायच्या आधीच आयरिश पोलो संघाचा माज उतरवला होता.

सगळा अनागोंदी कारभार. कोणी कोणास वाली नव्हता. कधी आदिलशहा, कधी निजाम. इतकंच काय तर कधी उत्तरेतील मुघल येऊन लुटालूट करून रक्तपात करून जात होते, अशी पुण्याची अवस्था होती. त्याच काळात जिजाऊ गरोदर होत्या. सुरू असलेल्या सर्व घडामोडींमुळे त्यांना शिवनेरीवर सुरक्षित हलवण्यात आलं होतं.

आणि तिथेच त्यांच्या धाकट्या मुलाचा आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा अर्थात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. महाराष्ट्राची काळरात्र संपवणाऱ्या स्वातंत्र्यसूर्याचाच जन्म झाला होता..!!!

शिवबा काही वर्षांचे झाल्यानंतर जिजाऊ शहाजीराजांकडे दक्षिणेत गेल्या. मात्र बंगळूरच्या त्या सोनेरी पिंजऱ्यात जिजाऊंना स्वातंत्र्याचा श्वास घेता येत नव्हता. याच काळात शहाजीराजांनी शिवबा राजे आणि संभाजी राजे यांच्याकडे ‘स्वराज्य’ म्हणजेच स्वतःचे- रयतेचे राज्य निर्माण करण्याचे आपले स्वप्न बोलून दाखवले.

त्यानंतर पुण्यात जाऊन शिवबा आणि जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करायचे आणि तिकडे संभाजीराजे व शहाजीराजांनी अप्रत्यक्षरीत्या शक्य ती मदत करायची, अशी योजना आखण्यात आली.

जिजाऊ पुन्हा पूणवडीस आल्या तेव्हा त्यांना दिसलं गेल्या बारा वर्षात पुण्याची स्थिती ओसाडच आहे. गावात कोण चिटपाखरु नाही. शेती रिकामी पडली आहे. रानावनात जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला आहे. गाढवाचा नांगर फिरवल्यामुळे पसरलेल भीतीचं वातावरण तूर्तास कायम होतं.

जिजाऊंनी कारभार हाती घेतला आणि पुनवडीचं रूपांतर होऊन पुणे झालं! पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊंचा मुक्काम सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खेड-शिवापूर येथील वाड्यात होता. या गावांच्या दरम्यान ‘शिवगंगा’ नावाची एक छोटी नदी आहे.

हेही वाचा:दाक्षिणात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..

जिजाऊ

पावसाळ्यात धो-धो पाऊस पडल्यानंतर दिवाळी दसरा झाला की हे पाणी वाहून जायचं आणि नद्या कोरड्या पडत. पाण्याची दुर्दशा व्हायची. त्यामुळे रयतेचे चांगलेच हाल होत. हीच गोष्ट जिजाऊंनी हेरली आणि शिवगंगा या छोट्याशा नदीवर बंधारे बांधायचं ठरवलं.

बसेश्वर, कुसगाव आणि रांजे गावच्या हद्दीत मध्ये जाऊन आऊसाहेब जिजाऊँमार्फत तीन बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे देखील साधेसुधे नव्हते. शंभर फूट लांबीचे असणाऱ्या या बंधाऱ्यांना पाणी सोडणारे दारे आहेत. दारे उघडण्याची आणि बंद करण्याची व्यवस्था आहे.

आज देखील सिंहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या या छोट्या बंधाऱ्यांना तुम्ही जाऊन पाहू शकता. आज देखील हे बंधारे अगदी सुस्थितीत आहेत. आऊसाहेब जिजाऊंची दूरदृष्टी किती व्यापक होती याचा एक अंदाज यावरून येतो. १२ मावळची कायापालट झाल्यानंतर शिवरायांच्याबद्दल रयतेमध्ये विश्वास निर्माण झाला. अगदी साधारण अन छोटंसं पुनवडी गावं पुणे शहर बनलं याचं सगळं श्रेय खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊँनाच जात!


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top