दाक्षिणात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..

By | July 26, 2022

दक्षिनात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..


पुरणाची पोळी हा संभाजी महाराजांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पुरणाची पोळी छत्रपती संभाजी महाराज अगदी मन लावून आणि पोट भरुन खात असत. कधी कधी तर, चक्क पूर्ण पोळी खाण्याची शर्यत आपल्या बहिणींसोबत आणि राजाराम राजेंसोबत संभाजी महाराज लावत असे. साहजिकच या शर्यतीमध्ये विजय देखील त्यांचाच होत असे.. मात्र, त्यांचा इतक्या आवडीची पुरण पोळी नाही तर त्यांचा आहार म्हणून वेगळाच पदार्थ प्रसिद्ध झाला होता…

जगभरात सांबर एक दाक्षिणात्य पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र ह्या पदार्थाचे चाहते आपल्याला बघायला मिळतात.

सांबर

आंबट-गोड आणि त्यात मसाल्यांचे सुगंध अशा परिपूर्ण पदार्थाचा आस्वाद संपूर्ण जगभरात लोकं घेतात. परंतु, खूप कमी लोकांना सर्वात प्रथम सांबर कसा बनला ह्याचा इतिहास माहित आहे.

होय, या रुचकर पदार्थाचे पूर्ण श्रेय छत्रपती संभाजी महाराज यांनाच जाते…

मराठी सत्तेची अंमल, संपूर्ण दक्षिण भारतात देखील असावी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. शिवाजी महाराजांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी संभाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली.

मैसूरच्या वाडियार चिक्कदेवराजाला हरवून संभाजी महाराजांनी विजय प्राप्त केला. असं सांगितलं जातं की, मैसूर च्या विजयानंतर आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज तामिळनाडूमध्ये तंजावर ला गेले.

व्यंकोजी राजेंचे सुपुत्र शाहूजी राजे त्यावेळी, तंजावरच्या गादीवर होते. आपल्या हाताने काही तरी उत्तम खाऊ घालायला पाहिजे अशी लहर त्यावेळी शाहूजी राजेंना झाली.

सांबर

मग, तूरीच्या डाळीची आमटी करत असताना आमसूल किंवा कोकम काहीच तिथे नव्हते. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यामध्ये चिंचेचा घोळ म्हणजेच चिंच घालण्याचे सुचवले. चिंच घालून केलेली ती तूर डाळीची आमटी चवीला खूपच रुचकर बनली आणि सर्वांनाच खूप आवडली.

त्यानंतर, संभाचा आहार म्हणून तिथे थोड्याच वेळात हि आमटी चांगलीच प्रसिद्ध झाली. संभाचा आहार म्हणून ह्या आमटीला सगळीकडे ‘सांबर ‘ असे संबोधण्यात येऊ लागले.

इडली, डोसा, उत्तपा किंवा भात अश्या कित्येक दाक्षिणात्य पदार्थांसोबत सांभार हे खाल्लेच जाते. सांभार नसेल तर त्या पदार्थांची चवच येत नाही.

वेगवेगळ्या भाज्या, मसाले टाकून बनवण्यात येणारे सांबर दाक्षिणात्य कुटुंबाबामध्ये जेवणात असेल तर, ते जेवण पूर्णच समजलं नाही जात.

दाक्षिणात्य समजला जाणारा सांभार हा पदार्थ एका मराठी राजामुळे बनला…

आपण दाक्षिणात्य बऱ्याच पदार्थांमध्ये चिंच घालतो, त्याची खरी सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांनीच केली आहे. चिंच घालून केलेला भात, केवळ दक्षिण मधेच नाही तर आपल्या महाराष्ट्रात देखील आवडीने खाल्ला जातो.

दाक्षिणात्य बऱ्याच पदार्थांमध्ये, महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद किंवा चव आपल्याला मिळते. त्याचे प्रमुख कारण हेच की, तिथेही मराठ्यांचे राज्य होते. त्यामुळे, सहाजिकच जेवणावर अश्या प्रकारचा प्रभाव असणारच…


हेही वाचा:

भारतातील या रहस्यमय रेल्वे स्टेशनवर रात्री कोणीही थांबत नाही, 3 नंबरच्या स्टेशनवर तर दिवसा ही जाण्यास घाबरतात लोक..

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *