भारतातील या रहस्यमय रेल्वे स्टेशनवर रात्री कोणीही थांबत नाही, 3 नंबरच्या स्टेशनवर तर दिवसा ही जाण्यास घाबरतात लोक..

भारतातील या रहस्यमय रेल्वे स्टेशनवर रात्री कोणीही थांबत नाही, 3 नंबरच्या स्टेशनवर तर दिवसा ही जाण्यास घाबरतात लोक..


ह्या जगात खरचं भूत आहेत का? मृत्यू झाल्यानंतर माणसाचा आत्मा खरच भटकत राहतो का? वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण कसे असू शकते. प्रत्येकाला नेहमी हा प्रश्न पडला की या जगामध्ये भूत आहेत का? आज आपण जाणून घेणार आहोत की भारतामधील अशा काही रेल्वे स्टेशन बद्दल ज्या ठिकाणी भूत आहे असं सांगणाऱ्या रहस्यमय घटना ….

१. बेगुंनकोटर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल: पश्चिम बंगाल मध्ये असलेले हे बेगुंकोदर रेल्वे स्टेशन  इथे घडलेल्या घटनेमुळे जवळपास ४२ वर्षे बंद होते. आज सुद्धा मणसे रेल्वे स्टेशनवर दिवस मावळला की जाण्यास घाबरतात १९६० मध्ये हे रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आलेले. १९६८मध्ये या ठिकाणी नेमलेल्या स्टेशन मास्तर ने रुळावर साडी नेसलेल्या एका बाईला तरंगत असताना पाहिले. तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी काही वर्षापूर्वी एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.

 

भीतीचे वातावरण तेव्हा पसरले जेव्हा रेल्वे कॉटर मध्ये स्टेशन मास्तर आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू झाला .त्यानंतर त्या ठिकाणी कोणताही स्टेशनमास्तर नियुक्त व्हायला तयार नव्हता .त्यानंतर जवळपास ४२ वर्षे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्यात आले.

२. बडोग स्टेशन, हिमाचल प्रदेश: हे स्टेशन १९०३ मध्ये सुरु करण्यात आले होते. काही प्रवाशांनी असे सांगितले आहे की त्या ठिकाणी असलेल्या ३३ नंबर बोगद्यातून विचित्र प्रकारचे आवाज एकू येतो. तो आवाज वेदनेने कळवळत असलेल्या व्यक्तीसारखा होता असा दावा त्यांनी केला. तेथील स्थानिक लोक या गोष्टीचा संबंध इतिहासातील काही घटनेशी जोडतात.

ब्रिटिश रेल्वे इंजिनिअर कर्नल बडोग यांना या ठिकाणी बोगदा निर्मितीचे काम सोपवले होते, परंतु ते या कामांमध्ये अयशस्वी झाले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्नल बडोग यांना सर्व कामगारां समोर सुनावले व त्यांचा अपमान केला आणि ह्याच कारणामुळे कर्नल बडोग यांना ३३ नंबर बोगद्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली.

याच गोष्टीवरून तिथे राहणाऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की कर्नल बडोग यांची आत्मा या ठिकाणी भटकत असतो.

रेल्वे स्टेशन

३. चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश.: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये असलेल्या या रेल्वे स्टेशन बद्दल म्हटले जाते की २०१३ मध्ये नवी दिल्ली ते केरळ जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे मध्ये हरिसिंग नावाचा एक सीआरपीएफ व्यक्ती प्रवास करत होता. काही कारणामुळे त्याचा टी टी सोबत वाद झाला. टी टी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मारहाण केली.जखमी अवस्थेत तो चित्तूर रेल्वे स्टेशन वरती उतरला आणि जास्त जखम झाल्यामुळे दहाव्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार आजही हरिसिंग ची आत्मा त्याठिकाणी न्याय मिळवण्यासाठी भटकत असते. म्हणूनच या स्टेशनवर रात्री कुणीही थांबत नाहीत. रात्री जर या स्थानकावरून कोणती गाडी धरायची असेल तर लोक त्याच्या समोरील स्टेशनवर जाऊन गाडीमध्ये बसतात.

४.सोहागपुर रेल्वे स्टेशन,मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ‘ होशंगाबाद’ जिल्ह्यातील सोहागपुर रेल्वे टेशन बद्दल असे म्हटले जाते की या ठिकाणी रात्री एका महिलेचा ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज येतो असतो. दिवस मावळला  कि त्याठिकाणी सगळीकडे शुकशुकाट पसरतो. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की याठिकाणी एका महिलेने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा आत्मा भूत बनून याठिकाणी इकडे-तिकडे भटकत असतो.

रेल्वे स्टेशन

अस असलं तरी वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी असलेले आवाज हे जास्त विद्युत प्रभावावर चालणाऱ्या रेल्वेमुळे रात्रीच्या शांती मध्ये वेगळे ऐकायला येतात.

५.द्वारका सेक्टर ९ रेल्वे स्टेशन, दिल्ली: द्वारका सेक्टर ९ हे दिल्लीतीळ प्रसिद्ध मेट्रो स्टेशन आहे.लोकांच्या म्हणण्यानुसार याठिकाणी एका मुलीची आत्मा भटकत असते .ती रात्रीच्या वेळी पांढऱ्या साडीमध्ये दिसते. काही लोकांनी तर असा दावा केला आहे की ही मुलगी गाड्यांचा पाठलाग करून दरवाजा ठोठावते. याच कारणामुळे रात्रीचे लोक या ठिकाणी जायला घाबरत असतात. या गोष्टी वरती संशोधन करण्यात आले तेंव्हा कोणत्याच गोष्टीचे प्रमाण आढळून आले नाही. या गोष्टीला अफवा म्हणून सोडून देण्यात आले.


हेही वाचा:

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top