Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!

Punjab floods 2025: उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या पुराच्या विळख्यात सापडली आहेत, आणि पंजाबमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे म्हटले जाते. लोकांना जीव वाचवण्यासाठी घरे सोडावी लागली. शेती उद्ध्वस्त झाली आहे. जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. आता या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.

Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!

Punjab floods 2025: पंजाब पूरग्रस्तांना हरभजन सिंगची मोठी मदत..!

माजी भारतीय फिरकी गोलंदाज आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी पूरग्रस्त राज्य पंजाबसाठी मदतकार्य सुरू करून बोटी आणि रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. यासोबतच ते मदतकार्यासाठी निधी गोळा करत आहेत.

हरभजन सिंग Harbhajan Singh) यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या खासदार निधीतून मदतकार्यासाठी आठ स्टीमर बोटी मंजूर केल्या आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या संसाधनातून आणखी तीन बोटी दिल्या आहेत.

हरभजन यांनी एकूण ११ स्टीमर बोटी दान केल्या आहेत. आठ त्यांच्या खासदार निधीतून आणि तीन त्यांच्या स्वतःच्या खिशातून. प्रत्येक बोटीची किंमत सुमारे ४.५ ते ५.५ लाख रुपये आहे, त्यांनी गंभीर आजारी लोकांना जवळच्या रुग्णालयात सहज पोहोचवण्यासाठी तीन रुग्णवाहिका देखील खरेदी केल्या आहेत.

Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!

Punjab floods 2025 : पंजाबमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत..!

गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे आणि नदीच्या बंधाऱ्यांना भेगा पडल्यामुळे पंजाबमध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत आणि पिकांचेही नुकसान झाले आहे.

अनेक जिल्हे अजूनही पाण्याखाली आहेत आणि राज्य सरकार आणि स्वयंसेवी गट बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. ही परिस्थिती लवकर सुधारेल आणि जनजीवन पूर्ववत होईल अशी मागणी लोक देवाकडे करत आहेत.


हेही वाचा:

Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!

 Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!

Sarfraz khan Century: सरफराज खानने ठोकले पुन्हा शतक, टीम इंडियाच्या निवड समितीला चोख उत्तर…!

चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा 

1 thought on “Punjab floods 2025: पंजाब मधील पूरग्रस्तांनसाठी धावून आला हरभजन सिंग, केली मोठी मदत.!”

Leave a Comment

error: