Rohit sharma About Retirement: T-20 आणि कसोटीमधून निवृत्ती बद्दल बोलतांना रोहित शर्मा भावूक, ‘नक्की का घेतला निर्णय?’

Rohit sharma About Retirement: भारतीय संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit sharma ) ने या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यापूर्वी रोहितने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली होती.

Rohit sharma About Retirement: T-20 आणि कसोटीमधून निवृत्ती बद्दल बोलतांना रोहित शर्मा भावूक, 'नक्की का घेतला निर्णय?'
Image Courtesy: BCCI

आता रोहित शर्मा भारताकडून फक्त एकदिवसीय सामन्यात खेळेल. तो शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून खेळला होता.  दरम्यान,  रोहितने आता त्याच्या कसोटी आणि टी-२० निवृत्तीबद्दलचे मौन तोडले आहे. आणि याबद्दल बोलतांना रोहित खूपच इमोशन दिसला…

Rohit sharma About Retirement: रोहितने सोडले मौन, ‘नक्की का घेतला निवृत्तीचा निर्णय?’

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला की,

यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल, कारण खेळासाठी दीर्घकालीन सहनशक्तीची आवश्यकता असते. विशेषतः कसोटी स्वरूपात, तुम्हाला पाच दिवस टिकून राहावे लागते. मानसिकदृष्ट्या ते खूप आव्हानात्मक आणि थकवणारे असते. पण सर्व क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून मोठे झाले आहेत. जेव्हा आपण स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा मुंबईतही, क्लब क्रिकेट सामने दोन किंवा तीन दिवस चालतात, तेव्हा आपण अशा प्रकारे तयार होतो आणि आपल्यासाठी ते अगदी लहानपणापासूनच सुरू होते.

याशिवाय, हिटमन पुढे म्हणाले की ,

जेव्हा तुम्ही सर्वात लांब फॉरमॅट खेळत असता तेव्हा खूप काही लागते आणि एकाग्रता ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुम्ही उच्च-स्तरीय कामगिरीबद्दल बोलत असता आणि जेव्हा तुम्ही उच्च-स्तरीय कामगिरीची अपेक्षा करता तेव्हा ते नेहमीच मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहण्यापासून सुरू होते. आणि मला वाटले की आता मी हे  आणखी करू शकणार नाही. भारतीय संघातील जागा सोडणे खूपच आव्हानात्मक आणि मनाला त्रास देणारे असते. 

Rohit sharma About Retirement: T-20 आणि कसोटीमधून निवृत्ती बद्दल बोलतांना रोहित शर्मा भावूक, 'नक्की का घेतला निर्णय?'

हे बोलताना रोहितच्या चेहऱ्यावर इमोशन साफ दिसत होते. त्याचे डोळे देखील पाणवले होते..

रोहित शर्मा मैदानावर कधी  परतणार?

रोहित शर्मा व्यतिरिक्त, विराट कोहलीने देखील कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता दोन्ही खेळाडू ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होतील. ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

रोहित आणि विराटचे लक्ष २०२७ च्या विश्वचषकावर आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आगामी एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या दोघांकडे पाहत आहे का? आणि हे दोघे आपली जागा संघात बनवू शकतील का?  हा एक मोठा प्रश्न आहे.


हेही वाचा:

Leave a Comment

error: