SA vs AUS: शुक्रवारी मॅके येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला आहे . वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांच्या धारदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणेअपयशी दिसले . या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रोलीयच्या हातातून मालिका हिसकावून घेतली आहे .
या पराभवासह ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱ्या एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आणि गेल्या १७ वर्षात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर चार मालिकांमध्ये हा तिसरा पराभव आहे.
SA vs AUS: लुंगी एनगिडी ठरला विजयाचा हिरो
एनगिडीने ४२ धावांत पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोखले. यष्टीरक्षक जोश इंग्लिसची ८७ धावांची आक्रमक खेळी देखील संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने २७७ धावा केल्या. वर्कलोड व्यवस्थापनामुळे कर्णधार टेम्बा बावुमाला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी एडेन मार्करामने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, परंतु तो खाते न उघडता केवळ चार चेंडूत बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने नवीन चेंडूने चांगली सुरुवात केली, जिथे जोश हेझलवुड आणि पदार्पण करणाऱ्या झेवियर बार्टलेटने सुरुवातीलाच धक्के दिले. असे असूनही, मॅथ्यू ब्रीट्झकेने ७८ चेंडूत ८८ धावांची आक्रमक खेळी खेळली आणि संघाला सांभाळले.
ब्रीट्झकेने सलग अर्धशतकांच्या (त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या चार एकदिवसीय सामन्यात ५०+ धावा) विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्याच वेळी, ट्रिस्टन स्टब्सने ८७ चेंडूत ७४ धावा करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
SA vs AUS: पहिल्या एकदिवसीय सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा दबदबा होता!
पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ९८ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि त्यानंतर केशव महाराजांच्या शानदार गोलंदाजीने (५ विकेट्स) पाहुण्या संघाला १९८ धावांत गुंडाळले. यामुळे आता ऑस्ट्रोलीयन खेळाडूंचे मनोबल चांगलेच कमी झाले असेल..
हेही वाचा:
1 Comment
Pingback: ODI World Cup 2027 चा प्लान तयार, या देशात या महिन्यात रंगणार थरार; खेळवले जाणार तब्बल एवढे सामने..! - yuvakatta.com