Sarfraz khan Century: बुची बाबू स्पर्धेत युवा खेळाडू सरफराज खानने पुन्हा एक हटके शतक ठोकून आपली ताकत दाखवून दिली आहे. जेव्हा त्याच्या वजनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते तेव्हा, त्याने त्याच्या फिटनेस वर काम केले.
त्याच्या फॉर्मवरून टीकाकारांनी त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता सरफराज खान त्याच्या बॅटने सर्वांना चोख उत्तर देत आहे. बुची बाबू स्पर्धेत सलग दोन सामन्यात दोन शतक ठोकले आहेत.. त्याच्या या खेळीने त्याने टीम इंडिया च्या निवड कर्त्यांचे लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे वेधले आहे.
Sarfraz khan Century: बुची बाबू मध्ये सरफराजने ठोकले दुसरे शतक.
सरफराजने पुन्हा एकदा ८ दिवसांत दुसरे शतक झळकावून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हरियाणाविरुद्ध खेळताना सरफराजने फक्त ९९ चेंडूत शतक झळकावले. सरफराज पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने १११ धावांची शानदार खेळी केली.
१८ ऑगस्ट रोजी, बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, सरफराजने त्याच्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. सरफराजने ९२ चेंडूत शतक झळकावले आणि १०५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना ९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार मारले. हरियाणाविरुद्धही हा जबरदस्त फॉर्म राखण्यात सरफराज यशस्वी झाला आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजाने शानदार फलंदाजी केली आणि ९९ चेंडूत शतक झळकावले. सरफराजच्या बॅटने ११२ चेंडूत १११ धावांची शानदार खेळी केली. सरफराजने ९ चौकार आणि ५ षटकार ठोकले. गेल्या ८ दिवसांत सरफराजच्या बॅटवरून हे दुसरे शतक आहे.
इंग्लंड दौऱ्यात सरफराजला दुर्लक्षित करण्यात आले होते.
सरफराज खान अलीकडेच त्याच्या उत्कृष्ट फिटनेसमुळे चर्चेत होता. सरफराजचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याने बरेच वजन कमी केले आहे. चांगल्या फिटनेसनंतर, इंग्लंड दौऱ्यासाठी संघात त्याची निवड होऊ शकते असे मानले जात होते.
निवडकर्त्यांनी सरफराजकडे दुर्लक्ष केले होते. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करून, सरफराज पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधत आहे. जर सरफराज हा फॉर्म कायम ठेवू शकला तर ,त्याला भारतीय भूमीवर होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते.
हेही वाचा:
- चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा
- “एक ट्रॉफी जिंकण्यासाठी RCB ला 18 वर्ष लागली, 5 जिंकण्यासाठी तर..” अंबाती रायडूने आरसीबी चाहत्यांची उडवली पुन्हा खिल्ली..!
- Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, याधीमध्ये केवळ एकच भारतीय खेळाडू..!
- World’s Best T-20 Players: विराट- रोहित नाही तर ‘हे’ आहेत टी-20 मधील सर्वोत्तम खेळाडू..!