शाहीद आफ्रिदी: आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. परंतु, अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती. असे असूनही, भारत सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI या सामन्यात खेळण्याची परवानगी दिली आहे.

आता या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लाक असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Aadridi)ने भारतीय संघातील मुस्लीम खेळाडूंबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.. नक्की काय म्हणाला आफ्रिदी पाहुया सविस्तर..
शाहीद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य, क्रिकेट विश्वस्त खळबळ!
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडूंवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. पाकिस्तानच्या सामा टीव्हीवर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेटपटूंबद्दल कठोर गोष्टी बोलताना दिसत आहे. आफ्रिदीचे असे विधान करणे नवीन नाही, कारण त्याने यापूर्वी भारत आणि त्याच्या खेळाडूंबद्दल चिथावणीखोर टिप्पणी केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये आफ्रिदी म्हणतो की, भारतातील खेळाडूंना त्यांची घरे जाळून टाकण्याची धमकी दिली जाते; त्याने असेही म्हटले आहे की काही खेळाडू जन्मापासूनच स्वतःला हिंदुस्थानी असल्याचे सिद्ध करण्यात गुंतलेले आहेत.
पुढे शाहिद आफ्रिदी म्हणाला, ”
खेळाडूंना धमक्या मिळतात, घरे जाळण्याचीही चर्चा आहे. काही गरीब लोक जन्मापासूनच ते भारतीय असल्याचे सिद्ध करत आहेत आणि तेच खेळाडू आशिया कपमध्ये समालोचन करण्यासाठी देखील येतात.”
आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना कधीह?
पाकिस्तानचा संघ १२ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ओमानविरुद्धच्या सामन्याने आशिया कपमधील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आगा सलमानच्या नेतृत्वाखालील या संघाने अफगाणिस्तान आणि यूएईविरुद्ध त्रिकोणी मालिका जिंकल्यानंतर स्पर्धेत प्रवेश केला आहे. भारताशी सामना करण्यापूर्वी पाकिस्तान ओमानविरुद्ध विजय नोंदवून चांगली सुरुवात करू शकतो.. नंतर त्यांना भारतीय संघाला सामोरी जावे लागणार आहे
हेही वाचा:
Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!