SL vs AFG: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या उत्साहात, श्रीलंकेचा एक खेळाडू दुःखाने ग्रासला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. सामन्यानंतर संघ व्यवस्थापकाने त्याला दुःखद बातमी सांगितली आहे. नंतर तो खेळाडू सामन्यानंतर लगेचच घरी परतला.
SL vs AFG सामन्यादरम्यान Dunith Wellalage च्या वडिलांचे झाले निधन ..!
हा दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) आहे, ज्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा वेल्लालागे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोलंबो येथे निधन झाले.
दुनिथ वेल्लालागेने आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंकेसाठी पहिला सामना खेळला होता. त्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी बेंचवर ठेवण्यात आले होते. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्याच्यासाठी विशेष प्रभावी नव्हता. त्याच्या चार षटकांमध्ये त्याने एक विकेट घेतली आणि ४९ धावा दिल्या. डावाच्या शेवटच्या षटकात, २० व्या, अफगाणिस्तानचा वरिष्ठ फलंदाज मोहम्मद नबीने वेल्लालागेविरुद्ध सलग पाच षटकार मारले.
वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच दिनुथ वेल्लालागेला खूप दुःख झाले. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये संघ व्यवस्थापक आणि सपोर्ट स्टाफ त्यांना सांत्वन देत असल्याचे दिसून आले आहे. असेही वृत्त आहे की ,वडिलांच्या निधनानंतरही वेल्लालागे मैदानावर उतरण्यास तयार होता. मात्र श्रीलंकन संघाने त्याला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला सुपर ४ सामन्याच्या आधी तो पुन्हा संघात सामील होऊ शकतो..
हेही वाचा:
is Katrina Kaif Pregnant? कतरिना कैफ लवकरच बनणार आई? विकीच्या घरात हलणार लवकरच पाळणा..
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
1 Comment
Pingback: IND vs OMAN: मैदानावर उतरताच आज टीम इंडिया रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरेल दुसरा संघ ..! - yuvakatta.com