या सनकी सम्राटाने चक्क आपल्या घोड्याला मंत्री बनवलं होत..

या सनकी सम्राटाने चक्क आपल्या घोड्याला मंत्री बनवलं होत..


 

इतिहासात एक रोमन सम्राट असाही होऊन गेला आहे, ज्याची किस्से आणि काम पाहून सर्वच जन त्याला नाव ठेवायचे. हा सम्राट सनकी तर होताच शिवाय तो  अतिशय क्रूर देखील होता. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जवळच्या लोकांपासून  राज्यातील सामन्य नागरिकांना नाहक त्रास तर दिलाच.परंतु कधीही न भरून निघणाऱ्या काही जखमाही दिल्या. त्याच्या अश्या विचित्र कृत्यांमुळेमुळे आजही इतिहासात त्याची  ‘सर्वांत सनकी रोमन  सम्राट‘ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

 

 या सम्राटाचे नाव होत कालिगुला.  त्याच्या कारकिर्दीत तो अत्यंत निर्दयी आणि निंदक मनाचा राजा म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याच्या कथांचे असे किस्से प्रचलित आहेत की ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

चला तर मग जाणून घेऊया कॅलिगुलाने केलेल्या विचित्र कृत्यांच्या मागे लपलेल्या त्याच्या आयुष्याशी संबंधित काही घटनाबद्दल..

कालिगुला हा रोमचा तिसरा सम्राट होता. त्याचे पूर्ण नाव गायस ज्युलियस सीझर जर्मनिकस होते. पुढे तो कालिगुला या नावाने प्रसिद्ध झाला. सम्राट व्हायच्या आधीच त्याने अनेक असे किस्से केलं ज्यामुळे  लोक त्याला वेडा म्हणायचे. कालिगुलाचा जन्म 31 ऑगस्ट 12 AD इटली मध्ये झाला. वडील जर्मनिकस आणि आई ऍग्रिपिना यांच्या सहा मुलांपैकी तो तिसरा होता. कालिगुला  रोमच्या प्रतिष्ठित कुटुंबातील होते. त्याचे पणजोबा महान ज्युलियस सीझर आणि आजोबा ऑगस्टस होते. त्यांचे वडीलही लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कालिगुलाची  लष्करी शिक्षणाची मोहीम सुरू झाली. लहानपणी त्याने अनेक दिवस एकसमान आणि लहान शूज परिधान केले होते. ज्याला बघून त्याला कालिगुला (छोटा बूट) म्हटले जायचे. जो त्याच्या नावाशी कायमचा जोडले गेले.

सम्राट

कालिगुलाच्या बालपणात त्यांचे आजोबा महाराज ऑगस्टस यांची राजवट संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. ते अस्वस्थ होत होते. अशा परिस्थितीत त्याने आपला दुसरा मुलगा टायबेरियस याला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले.

19 ऑगस्ट 14 इ.स. मध्ये कालिगुलाचे आजोबा ऑगस्टस यांचा मृत्यू झाला आणि रोमन साम्राज्याची सत्ता टायबेरियसच्या हाती आली. टायबेरियस एक लोकप्रिय आणि कपटी शासक होता.राजसत्ता आपल्याच हातात राहावी म्हणून त्याने  कालिगुलाचे वडील आणि त्याच्या भावाची हत्या केली. त्याला भीती होती की राज्यातील  लोक कदाचित आपल्या भावाला राजा म्हणून घोषित करतील, कारण तो लोकप्रिय शासक म्हणून ओळखला जात होता.

एवढेच नाही तर टायबेरियसने त्याची मेहुणी आणि दोन्ही मोठ्या पुतण्यांनाही कैद केले. जिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. अत्याचार एवढे मोठे होते की त्यांचा  भूक आणि तहानने  मृत्यू झाला. अशा परिस्थितीत ऑगस्टसची पत्नी आणि कालिगुलाच्या आजीने त्याला आणि त्याच्या तीन बहिणींना आपल्याजवळ ठेवले.

हेही वाचा: महेंद्रसिंह धोनी कर्णधार बनताच या 5 खेळाडूंची चमकली किस्मत,आज झालेत अतिशय प्रसिद्ध खेळाडू..

कालिगुलाला त्याच्या आजीने क्रूर शासक आणि तिचा मुलगा टायबेरियसपासून वाचवले. कालिगुलानेही वडिलांच्या मारेकऱ्याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. कालिगुला मोठा झाल्यावर त्याने अशा काही गोष्टी करायला सुरुवात केली, जेणेकरून टायबेरियसला त्याच्या साम्राज्यात आमंत्रित करण्यात आनंद होईल. पुढे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. इसवी सन 31 मध्ये त्याने कालिगुलाला कॅप्री बेटावर बोलावले. कॅलिगुलाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवत वडिलांच्या मारेकऱ्याचे कौतुक केले.वरवरून जरी तो कौतुक करत असला तरीही आतून मात्र तो बदला घेण्यासाठी तडपडत होता.

 

अश्याच परिस्थितीत त्याने आपले काका महाराज टिबेरियस यांचा विश्वास जिंकण्यात यश मिळविले.

नंतर महाराजांनी आपल्या मुलासह कालिगुलाला वारस म्हणून निवडले. महाराजा टायबेरियसचा मृत्यू इसवी सन 37 मध्ये झाला. त्याच्या मृत्यूचे कारण जनतेने कालिगुलाला मानले होते.

टिबेरियसच्या मृत्यूनंतर, कालिगुलाने टायबेरियसच्या इतर वारसांना मृत्युदंड दिला आणि रोमची संपूर्ण सत्ता त्याच्या हातात घेतली गेली. सम्राट झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच जनतेचा विश्वास जिंकला. टायबेरियसच्या राजवटीत अन्यायाने कैदेत टाकलेल्या सर्व नागरिकांना त्याने प्रथम मुक्त केले. तसेच लोकांच्या मनोरंजनासाठी रथ दौड, बॉक्सिंग मॅच, नाटक इत्यादी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. रोमच्या प्रत्येक नागरिकाने त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांची प्रतिमा पाहिली. त्याच्या कारकिर्दीत सर्वजण सुखी होते.

कालिगुला सम्राट झाल्यानंतर काही महिन्यांनी आजारी पडला. तो मृत्यू आणि जीवन यांच्यातील लढाई लढत होता. मात्र, तब्बल ६ महिन्यांनी तो पुन्हा बरा झाला. त्याने पुन्हा रोमचा ताबा घेतला. परंतु आजारपणानंतर कालिगुलाचा मूड बदलला होता. कॅलिगुला आधीच पातळ आणि दुबळा होता. त्याचे डोळे पाणावले होते. तो खूप कुरूप दिसत होता. आता तो चिडचिडेपणाचाही शिकार झाला होता. लोक त्याच्या दिसण्याची तुलना शेळीशी करायचे. अशा स्थितीत दयाळू राजाने आपली क्रूरता दाखवायला सुरुवात केली. एखाद्या व्यक्तीकडून शेळीचा उल्लेख ऐकला की तो त्याला जिवे मारायचा.

सम्राट

आता कालिगुलाने आपल्या नागरिकांचा छळ सुरू केला होता . त्याच्या विचित्र कृतींमुळे लोक त्याला विक्षिप्त आणि वेडे म्हणायचे. दरम्यान, क्रूरतेच्या भरात त्याने  त्याची बहीण ज्युलिया सोबतही अनैतिक संबंध ठेवले.त्याच्या मृत्यूनंतर कालिगुलाला मंदिराची स्थापना झाली. त्यात त्याने आपल्या बहिणीचा पुतळाही बसवला. आज रोममध्ये तिची ‘प्रेमाची देवी’ म्हणून पूजा केली जाते.

 

कालिगुलाने चार लग्ने केली होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने लग्नाच्या दिवशी एका मुलीला पळवून नेले आणि लग्न केले. यानंतर आधीच विवाहित महिलेसोबत तिसरा विवाह केला. नंतर त्याने चौथ्यांदा मिलोनिया नावाच्या स्त्रीशी लग्न केले. पत्नी मिलोनियालाही काही प्रमाणात काबूत आणण्यात यश आले. पण त्याच्या क्रौर्यासमोर तीच काहीही चालले नाही. कालिगुलाने तिला एकदा तर चक्क आपल्या मित्रांसमोर नग्न करून फिरवलं होत.

शिवाय आपल्या राज्यात  फिरतांना एखादी चांगली महिला दिसली की  तो लगेच तिचे केस कापायला लावायचा आणि तिला विद्रूप करायचा.सहज म्हणून तो आपल्या मंत्र्यांना घोड्याऐवजी पाई फिरवायचा.

 

कालिगुला त्याच्या बाथटबमध्ये सोन्याची नाणी टाकून आंघोळ करत असे. एवढेच नाही तर अनेकवेळा तो जमिनीवर सोने टाकून त्यावर चालत असे. वितळलेले मोती व्हिनेगरमध्ये घालून तो ते प्यायचे. त्याच्या छंदांना काहीच सीमा उरली नव्तेहती. त्या निर्दयी सम्राटाने आपला छंद पूर्ण करण्यासाठी जनतेची पर्वा केली नाही.

 

कालिगुलाला घोड्यांच्या शर्यतीत खूप रस होता. तो या खेळावर खूप पैसा खर्च करतो. तो त्याच्या मित्रांसोबत खूप एन्जॉय करायचा. जेव्हा जेव्हा त्याच्या मित्राचा घोडा जिंकायचा तेव्हा तो त्याला मारायचा. एकदा एका ज्योतिषाने भाकीत केले की, जर कालिगुलाने घोड्यावर बसून खाडी ओलांडली नाही तर त्याचे राज्य संपेल. अशा परिस्थितीत त्याला समुद्रावर पूल बांधून मिळाला. त्यानंतर त्याने ती खाडी पार केली. असे म्हणतात की त्याच्या या कामाच्या प्रचंड खर्चामुळे रोममध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सम्राट

तो नंतर वेडा झाला आणि मुलींचे कपडे घालू लागला. यासोबतच त्यांना घोड्यांची खूप आवड होती.  आपला सर्वांत आवडता असलेल्या घोड्याला त्याने एकदा चक्क मंत्री बनवलं होत. त्याला रोममध्ये देवाचा दर्जा मिळावा अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी स्वत:ची मूर्ती तयार करण्याचे आदेशही दिले. रोमन नागरिक त्याच्या वेडेपणाला बळी पडत होते. गरिबीने त्या देशाला ग्रासले होते. अशा परिस्थितीत रोमन लोकांनी दुष्ट आणि पापी राजाविरुद्ध कट रचले.

41 मध्ये एका क्रीडा स्पर्धेदरम्यान त्याची हत्या करण्यात आली. नंतर त्याची पत्नी आणि मुलगीही मारली गेली. त्याच्या मृत्यूनंतर, रोमन साम्राज्याला क्लॉडियसच्या रूपाने एक यशस्वी सम्राट मिळाला. तर या रोमन साम्राज्याच्या विक्षिप्त आणि जुलमी शासक कालिगुलाच्या जीवनाशी संबंधित काही कथा होत्या, ज्यासाठी तो आजही जगाच्या इतिहासात स्मरणात आहे.

काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याच्या कुटुंबावर लहानपणी झालेल्या अत्याचारामुळे  त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. तर दुसरीकडे काही लोक त्याच्या या वागण्याला रोगाच नाव देतात. पण ते काहीही असलं तरी कालिगुलाच्या या असल्या वागण्यामुळे त्याच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला तर दुसरीकडे इतिहासात एक सर्वात विचित्र सम्राट म्हणून त्याची ओळख निर्माण झाली..


हेही वाचा:

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top