पोट भरण्यासाठी आधी फळांची गाडी चालवणाऱ्या या खेळाडूला आरसीबीने करोडपती बनवलंय..

पोट भरण्यासाठी आधी फळांची गाडी चालवणाऱ्या या खेळाडूला आरसीबीने करोडपती बनवलंय..


आयपीएलने अनके युवा खेळाडूंना स्टार बनवलं आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक अनेक युवा खेळाडू आहेत जे आयपीएल मध्ये दाखल होण्याआधी अत्यंत साधे राहणीमान आणि गरिबीमध्ये रहात होते. परंतु आयपीएल लिलावात दाखल झाल्यावर त्यांच्यावर मोठी बोली लागली आणि त्यांच आखे आयुष्यच बदलून गेलं.

अश्याच खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ‘टायमल मिल्स’   मिल्सला आयपीएल मध्ये पहिल्यांदा संधी दिली ती आरसीबीने. आयपीएलच्या दहाव्या सीजन मध्ये आरसीबीने मिल्सला तब्बल १२ कोटींची बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतलं पण त्याआधी मिल्सचं आयुष्य हे अत्यंत खडतर राहिलं होत.  क्रिकेटर होण्यापूर्वी मिल्स फळांच्या दुकानात काम करायचा, पण आयपीएलमध्ये संधी मिळाल्यानंतर मिल्सचे आयुष्य बदलले.

खेळाडू

आयपीएल 10 मध्ये मिल्सला बेंगळुरूने विकत घेतले होते. त्या काळी या संघाचा कर्णधार विराट कोहली होता. आयपीएलपूर्वी मिल्सने केवळ 4 टी-20 सामने खेळले होते. त्याला आयपीएलमध्ये बंगळुरूने 12 कोटींची मोठी रक्कम देऊन खरेदी केले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मिल्सने आतापर्यंत इंग्लंडसाठी एकही कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळलेला नाही. पण आयपीएलमध्ये मिळालेल्या एवढ्या मोठ्या रकमेमुळे तो आयुष्य चांगल्या प्रकारे जगतो.

आयपीएलमध्ये 12 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतरही मिल्सने त्यातील काही भाग आपले छंद पूर्ण करण्यात खर्च केला आहे. या पैशातून त्यांनी प्रथम आलिशान कार खरेदी केली. याशिवाय या पैशातून बंगला घेण्याचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. आयपीएलमध्ये जेव्हा त्याला विचारण्यात आले की या पैशाचे तू काय करणार आहे, तेव्हा त्याने या पैशातून स्वत:साठी घर घेणार असल्याचे सांगितले.

मिल्सने अनेकवेळा पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही मिल्सची कामगिरी काही खास नव्हती आणि त्याला 5 सामन्यात केवळ 5 विकेट घेता आल्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top