Team India Next ODI Captain: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. रोहितने कसोटीमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) भारतीय कसोटी संघाची सूत्रे हाती घेतली आहेत. ज्यामुळे रोहितनंतर अनेक लोक शुभमनलाच एकदिवसीय कर्णधार म्हणूनही पाहत आहेत.
मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना शुभमन नाही तर दुसरा खेळाडू रोहित नंतर भारतीय संघाचा कर्णधार व्हावे, असे वाटते.
रोहितनंतर श्रेयस अय्यर पुढचा एकदिवशीय कर्णधार व्हावा – मनोज तिवारी ( Team India Next ODI Captain:)
मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, श्रेयस अय्यर पुढचा कर्णधार व्हावा मात्र त्याच्यासाठी गोष्टी सोप्या नसतील. तो म्हणाला, ‘
रोहित शर्मानंतर, मी स्पष्टपणे श्रेयस अय्यरचे नाव घेईन. तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये संघाचे चांगले नेतृत्व करतो. मी त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाहिले नाही परंतु त्याने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ट्रॉफी जिंकल्या आहेत.
मनोज पुढे म्हणाले, ‘
मला वाटते की श्रेयस अय्यर पुढे टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तो बराच काळ कर्णधार राहील. तथापि, दरम्यान, तो शुभमन गिलसोबत कर्णधारपदासाठी लढेल, कारण सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना श्रेयस अय्यरपेक्षा गिल जास्त आवडतात. त्यामुळे त्यांच्यात लढाई होईल. भविष्यात काय होते ते पाहायचे आहे.’
मनोज तिवारीने गौतम गंभीरवर केले मोठ आरोप.!
संभाषणादरम्यान मनोज तिवारी म्हणाले की,
श्रेयस अय्यरला केकेआरच्या विजयाचे श्रेय मिळाले नाही. त्यांनी गौतम गंभीरवर आरोप केले आणि सांगितले की, गंभीरच्या पीआर टीमने गोष्टी बदलल्या. ‘केकेआर २०२४ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला पण श्रेयसला त्याचे श्रेय मिळाले नाही. पीआर अशा प्रकारे गेला की संघातील फक्त एकाच व्यक्तीला श्रेय मिळाले. मला असेही वाटले की, चंद्रकांत पंडित आणि भरत अरुण यांच्यासोबत त्याला श्रेय मिळायला हवे होते. तो सपोर्टिंग स्टाफमध्ये होता आणि लीडर मैदानावर राहून निर्णय घेत होता.’
हेही वाचा: