Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI: ऑनलाइन गेमिंग उद्योगाला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या ड्रीम-११ ने आशिया कप २०२५ च्या आधी महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रीम 11 ने मोडला बीसीसीआय सोबतचा करार (Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI)
वृत्तानुसार, ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये टीम इंडिया च्या जर्सीवर ड्रीम-११ चा लोगो दिसणार नाही. कंपनीने बीसीसीआयसोबतचा करार रद्द केला आहे. ज्या करारानुसार ड्रीम ११ 2026 पर्यंत भारतीय संघाचा प्रायोजक होता ज्यातून बीसीसीआयला वार्षिक 358 कोटी रु मिळणार होते. ते आता रद्द झाले आहेत.
ऑनलाइन गेमिंग बिल ड्रीम-११ साठी बनले घातक ..!
अलीकडेच मंजूर झालेल्या ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विधेयकाअंतर्गत, ड्रीम-११ सह रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.
ड्रीम-११ च्या ६७% महसूल या मॉडेलमधून येत होता, ज्यामध्ये वापरकर्ते पैसे गुंतवून फॅन्टसी टीम तयार करत असत आणि जिंकल्यावर रोख बक्षिसे मिळवत असत. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, हे व्यवसाय मॉडेल बेकायदेशीर ठरले, ज्यामुळे कंपनीला त्यांचे कामकाज बंद करावे लागले आहे.
बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा करार केला रद्द (Team India Sponsor Dream 11 break Contract with BCCI)
ड्रीम-११ ने २०२३ मध्ये बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा प्रायोजकत्व करार केला होता, जो २०२६ पर्यंत वैध होता. या करारांतर्गत बीसीसीआयला देशांतर्गत सामन्यांसाठी ३ कोटी रुपये आणि परदेशी सामन्यांसाठी १ कोटी रुपये मिळत होते.
कायदा लागू झाल्यानंतर, हा करार वेळेपूर्वीच संपला आहे. आता बीसीसीआय नवीन प्रायोजकाच्या शोधात निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करत आहे.
बंदीनंतर ड्रीम ११ नव्या इनिंगच्या तयारीत..!
ड्रीम ११ कंपनीने आता आपली रणनीती बदलली आहे आणि नॉन-रिअल मनी गेमिंग उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्पोर्ट्स ड्रिप, फॅनकोड आणि विलो टीव्ही आणि क्रिकबझ सारख्या इतर गुंतवणुकीचा समावेश आहे.
भारताची ऑनलाइन गेमिंग बाजारपेठ सुमारे ३२,००० कोटी रुपयांची आहे, ज्यापैकी ८६% महसूल रिअल-मनी गेमिंगमधून आला आहे. नवीन कायद्यानंतर हा आकडा बदलणार आहे. या निर्णयामुळे सुमारे दोन लाख नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि सरकारला मोठ्या प्रमाणात कर नुकसान होऊ शकते.
हेही वाचा:
1 Comment
Pingback: Asia Cup 2025 मधून बाबर- रिजवानला बाहेर का ठेवले? अखेर पीसीबी अध्यक्षांनी दिले उत्तर..! - yuvakatta.com