Team india women Squad for World cup 2025: भारतीय भूमीवर होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी ( भारतीय संघाची घोषणा (Team india women Squad Announced for World cup 2025) करण्यात आली आहे.
हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यष्टीरक्षक म्हणून रिचा घोषला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. तिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
डिसेंबरमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रतिका रावललाही संघात स्थान देण्यात आले आहे. यासोबतच अमनजोत कौरचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडकर्त्यांनी शेफाली वर्माला वगळून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिला 15 खेळाडूंच्या या यादीमध्ये स्थान मिळवता आले नाहीये.
Team india women Squad for World cup 2025 :असा आहे विश्वचषक साठी भारतीय महिला संघ .
#TeamIndia squad for ICC Women’s Cricket World Cup 2025⬇️
Harmanpreet Kaur (Capt), Smriti Mandhana (VC), Pratika Rawal, Harleen Deol, Deepti Sharma, Jemimah Rodrigues, Renuka Singh Thakur, Arundhati Reddy, Richa Ghosh (WK), Kranti Gaud, Amanjot Kaur, Radha Yadav, Sree Charani,…
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2025
कधीपासून सुरु होणार महिला विश्व चषक 2025?
महिला विश्वचषक 2025 ला 30सप्टेबरपासून सुरवात होणार आहे. भारत या स्पर्धेचे यजमान पद सांभाळणार आहे तर, पहिला सामना भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत साखळी, उपांत्य आणि अंतिम सामना असे मिळून 31 सामने खेळवले जाणार आहेत..
हेही वाचा: