2023 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताहेत हे 8 मोठे चित्रपट,बॉलीवूडची इज्जत वाचवू शकणार का? खान मंडळी…

2023 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताहेत हे 8 मोठे चित्रपट,बॉलीवूडची इज्जत वाचवू शकणार का? खान मंडळी…


2022 वर्ष जवळपास आता अर्ध्याहून अधिक संपलेलं आहे. या संपूर्ण वर्षात खास करून चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काही वेगळे असे चेंजेस पाहायला मिळाले. कधी सर्वांच्या वर असणारी बॉलीवूड इंडस्ट्री या वर्षात स्ट्रगल करतांना दिसतेय तर , दुसरीकडे आधी लहान इंडस्ट्री असणारी दक्षिण चित्रपट इंडस्ट्री मोठ मोठे सिनेमे यशस्वीरीत्या पर पाडताहेत..

त्याचबरोबर या काळात अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले असून आता येत्या काही महिन्यांत आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण आता प्रेक्षक 2023 ची वाट पाहत आहेत.  2022वर संपूर्णपणे दक्षिण इंडस्ट्रीचं राज्य चालल असं म्हटल तर वावग ठरणार नाही.

2022मध्ये प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे खेचू न शकलेले बॉलीवूड अभिनेते आणि निर्माते नक्कीच या गोष्टीवर विचार करून 2023 मध्ये बॉलीवूडला परत सिनेमागृहात आणतील, त्याची एक झलक सुद्धा आपल्याला काही चित्रपटांच्या ट्रेलर मधून दिसतेय. हे ते चित्रपट आहेत जे 2023मध्ये प्रदर्शित होणार आहेत. कदाचित हे बिग बजेट चित्रपट संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील.चला तर जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते चित्रपट..

चित्रपट

पठाण:तब्बल 4 वर्ष एकही चित्रपट न करणारा अभिनेता शाहरुख खान 2023 मध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज असेल. शाहरुखचा पठाण हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट देखील पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शहारुखचा हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल,असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर दुसरीकडे या चित्रपटाला  बायकोट करण्याचा ट्रेंडही आजपासूनच सुरु झालाय.

आदिपुरुष: अभिनेता प्रभासचा आदिपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.प्रभासचे करोडे चाहते आणि सिनेमाचा हिंदू धर्म देवता श्रीरामाशी असलेलं कनेक्शण पाहता आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर दहाडणार असचं म्हणावं  लागेल.

चित्रपट

रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी: हा चित्रपट निर्माता करण जोहर बनवत असून यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.करण जोहरला या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा असतील कारण याआधीचे त्याचे जवळपास ४ चित्रपट चांगला गल्ला जमवण्यात अपयशी ठरले होते.

बुल और बवाल:हा चित्रपटही आता खूप चर्चेत आला असून, या चित्रपटात शाहिद कपूर दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कहाणी जरी कोणाला माहिती नसली तरी शहीद कपूर या एका नावामुळेच तो 2023 च्या चित्रपटांतील आघाडीचा सिनेमा म्हणून प्रेक्षक त्याची वाट पाहताहेत. अर्थातच याला जबाबदार आहे तो शाहीद कपूरचा जबरदस्त अभिनय..

चित्रपट

टायगर 3:  टायगर 3 हा सुद्धा 2023 मध्ये मोस्ट  वेटेड  चित्रपट आहे. प्रेक्षक सलमान खानच्या टायगर 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपटही ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 21 एप्रिल 2023 रोजी चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे.

फाइटर: हा चित्रपट देखील खास असणार आहे ज्यामध्ये हृतिक आणि दीपिका एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट गांधी जयंतीच्या आसपास म्हणजेच 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

डंकी :  2023 मध्ये प्रदर्शित होणारे हे दोन्ही चित्रपटही सध्या  चर्चेत आहेत. डंकीमध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.

एनिमल: सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या आसपास प्रदर्शित होणार आहे.

तर मित्रांनो हे होते 2023 मध्ये प्रदर्शित होणारे काही खास चित्रपट ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील कोणत्या चित्रपटाची वाट तुम्ही जास्त आतुरतेने पहात आहात, हे कमेंट करून नकी सांगा..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top