भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ने भारत अ संघाकडून पदार्पणातच एका शानदार खेळीने इतिहास रचला. १४ वर्षीय या फलंदाजाने दोहा येथे युएईविरुद्ध अवघ्या ३२ चेंडूत शतक ठोकून जगाचे लक्ष वेधून घेतले.
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून डावाची सुरुवात करताना वैभवने ४२ चेंडूत १४४ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता. त्याची ही खेळी भारतासाठी संयुक्तपणे दुसरे सर्वात जलद टी२० शतक आहे. त्याच्यापेक्षा फक्त उर्विल पटेल आणि अभिषेक शर्मा यांनीच जलद शतके केली आहेत.
WHAT. A. KNOCK 🤯
Vaibhav Suryavanshi lights up India A’s #RisingStarsAsiaCup opener with a magnificent 32-ball HUNDRED 👏🙌
Updates ▶️ https://t.co/c6VL60RuFV pic.twitter.com/iT0mvtOljo
— BCCI (@BCCI) November 14, 2025
वैभवचे शतक हे जगातील सहावे सर्वात जलद टी२० शतक आहे.
सर्वात जलद टी-२० शतके (Fastest Century in T-20)
- साहिल चौहान २७ (चेंडू)
- उर्विल पटेल २८
- अभिषेक शर्मा २८
- मोहम्मद फहाद २९
- ख्रिस गेल ३०
- ऋषभ पंत ३२
- वैभव सूर्यवंशी ३२*
वैभवचे हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे टी-२० शतक आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०२५ (IPL 2025) मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून ३५ चेंडूत शतक झळकावले होते. सू
र्यवंशी आता टी-२० क्रिकेटमध्ये ३५ चेंडू किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोन शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम उर्विल पटेलच्या नावावर होता. अभिषेक शर्मा आणि डेव्हिड मिलर यांचाही या यादीत समावेश आहे.

४० चेंडूंपेक्षा कमी वेळात एकापेक्षा जास्त टी-२० शतके झळकावणारे खेळाडू:
- वैभव सूर्यवंशी ३२ आणि ३५
- उर्विल पटेल २८ आणि ३६
- अभिषेक शर्मा २८ आणि ३७
- डेव्हिड मिलर ३५ आणि ३८
वैभवची ही कामगिरी पाहता तो येत्या काळात टीम इंडियासाठी नवा सुपरस्टार म्हणून उदयास आला तर नवल नको वाटायला. आतापासूनच त्याचे टीम इंडियातील वाटचाल उच्वल अशी दिसत आहे.. त्याची टीम इंडियात निवड होण्यासाठी आजून त्याला किमान 3 वर्ष वाट पहावी लागणार आहे!
हेही वाचा:
IND vs AUS 1st Test: पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी रचला इतिहास, जसप्रीत बूमराहने केला पंजा ओपन.!