वैभव सूर्यवंशी: वैभव सूर्यवंशी हे असे नाव आहे ज्याला भारतीय क्रिकेट संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. वैभवने आपल्या जबरदस्त फलंदाजीने आयपीएल २०२६ मध्ये धुमाकूळ घातला आणि ‘ऑरेंज कॅप’ही पटकावली. सध्या ‘इंडिया ए’ (India A) संघाचा भाग असलेला वैभव श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत खेळणार आहे.
दरम्यान, त्याला वरिष्ठ भारतीय संघात कधी संधी मिळू शकते, याबद्दल बीसीसीआयने (BCCI) एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड कधी होणार?
जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) बीसीसीआय 1६ जून रोजी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण बीसीसीआय सहसा या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंचा समावेश असलेला संघ पाठवते. यापूर्वी तिलक वर्मा, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांसारख्या खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती; आता वैभव सूर्यवंशीची पाळी येऊ शकते. २०२६ ची आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
६ जून रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघासोबतच, आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही भारतीय संघांची घोषणा केली जाईल. टी-२० संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे; सूर्यकुमार यादवकडून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

IPL 2026 मध्ये वैभवची शानदार कामगिरी!
वैभवने आयपीएल २०२६ मध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी केली, जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आणि जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांची वाहवा मिळवली. २०२६ च्या आयपीएल हंगामात त्याने १६ सामन्यांमधील १६ डावांत एकूण ७७६ धावा केल्या. या मोसमात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली, तसेच २०० हून अधिकचा स्ट्राईक रेट कायम राखला. त्याने ६३ चौकार आणि ७२ षटकारही ठोकले, ज्यामुळे एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याचा मान त्याने मिळवला.
हेही वाचा:
- अंगकृष रघुवंशी च नाही तर हे खेळाडूही झाले होते ‘Obstructing the Field’ आउट?, नक्की काय आहे प्रकार?
- DC vs RCB: विराट कोहली इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच खेळाडू..!
- IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!
