मैदानावर धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे आजही विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाय..

मैदानावर धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे आजही विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाय..


भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत बिकट दिवसांतून जातोय. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या सामन्यातही आज विराट धावा काढण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता सोशल मिडीयावर त्याच्या विरुद्ध आवाज उठवून त्याला चांगलच ट्रोल केलं जातंय.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना आज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला, तर दुसरी वनडे इंग्लंडने 100 धावांनी जिंकली.team india batsman virat kohli kevin pietersen tweeted in support | विराट  कोहली के सपोर्ट में उतरा ये इंग्लिश दिग्गज, देखकर खुश हो जाएंगे भारतीय फैंस  | Hindi News

अशा परिस्थितीत हा सामना जिंकून दोन्ही संघांना एकदिवसीय मालिकेवर कब्जा करायचा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ 259 धावांवर सर्वबाद झाला.

दुसऱ्या डावात फलंदाजी  करण्यास आलेल्या टीम इंडियाला सुरवातीलाचं दोन मोठे धक्के बसले. पण सर्वांत मोठा धक्का बसला तो थोडासा  लयीत दिसनाऱ्या विराट कोहलीच्या रूपाने. आणि ट्रोल करणाऱ्यांच्या निशाणावर पुन्हा एकदा विराट आला..

विराटची मागच्या काही सामन्यातील कामगिरी पाहता आता त्याने स्वतःहून क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला पाहिजे असं काही लोकांना वाटतंय. तर दुसरीकडे भारताचे माजी खेळाडूही त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देताहेत.

एकूण परिस्थिती काय तर विराटला सध्या एकतर त्याचा फॉर्म साथ देत नाय आणि दुसरीकडे लोक त्याच्याबद्दल नेगेटिव्ह पोस्ट करत आहेत. म्हणूनच विराट कोहलीने खरच आता निवृत्ती घ्यायला हवी का? असा प्रश्न पडतोय.

तर याचं उत्तर स्वतः भारतीय संघाचा  कर्णधार रोहित शर्माने दिलंय. रोहितच्या एका वाक्यानेच विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या लोकांचे तोंड बंद होईल. 

विराट कोहली

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाराभावाच तोंड पाहावं लागल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रोहित म्हणाला होता की, विराट हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे 7/8 सामने  धावा नाही काढू शकल्यास तो माणूस खेळण्याच्या योग्य नाही किंवा त्याला खेळता येत नाही,असं समजणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल. शिवाय जे विराट ला निवृत्तीचा सल्ला देताहेत ते सर्व मैदानाबाहेरचे आहेत. त्यामुळे मैदाना बाहेरील व्यक्तीला त्या खेळाबद्दल किती माहिती आहे, आणी तो किती बोलतोय ? यावर एखाद्या खेळाडूची कारकीर्द अवलंबून असू शकत नाही.

रोहित पुढे म्हणाला की, विराट मध्ये अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे. लवकरच तो फॉममध्ये परत येईल आणि भारतीय संघासाठी धावा काढेल. त्यामुळे त्याला निवृत्तीचा सल्ला देण्याची सध्या तरी गरज नाही.प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तसा सध्या विराटच्याही आयुष्यात उतार सुरु आहे पण लवकरचं तो यातून बाहेर येईल. आणि भारतीय संघासाठी आणखी धावा काढेल, असा विश्वासही रोहित शर्माने व्यक्त केला होता.

 

रोहित शिवाय इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम,  शाहीद आफ्रिदी, जसप्रीत बूमराह यांसारख्या स्टार खेळाडूंनीही विराटच्या पाठीमागे उभे राहून त्याला प्रोत्साहित करण्याचं काम केलंय. त्यामुळे विराटने निवृत्ती घ्यावी असं कोणाला वाटत असेल, तर ते सध्या तरी शक्य नाही.

सोशल मिडियावर  त्याच्या विरुद्धात कितीही पोस्ट झाल्या तरी विराट सध्या निवृत्तीच्या मूड मध्ये नक्कीचं नाहीये. हा पण पुढच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या  सिरीजमध्ये त्याला विश्रांती  जरुर देण्यात आलीय. त्यानंतर विराट भारतीय संघात पुनरागमन अगदी थाटात करेल. अशीच इच्छा बाळगूया..


हेही वाचा:

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top