टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहेत. दोघांनीही टीम इंडिया कडून खेळताना त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांचे पुनरागमन निश्चित दिसते. पण त्याआधी क्रिकेटर युवराज सिंगचा पिता योगराज सिंग (Yograj SIngh) ने दोन्ही खेळाडूंना चांगलेच झापले आहे. शिवाय त्यांनी बीसीसीआयला सुद्धा खरी खोटी सुनावली आहे.. नक्की काय आहे प्रकरण ? जाणून घेऊया सविस्तर..

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यावर युवराजचा पिता योगराज सिंग यांची टीका!
योगराज सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की,
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. त्यांनी म्हटले की खेळापेक्षा कोणीही मोठे नाही. हे दोन्ही खेळाडू स्वतः ला खेळ आणि बीसीसीआय यांच्यापेक्षा मोठे समजतात.
त्यांनी बीसीसीआयला सल्ला दिला आणि सांगितले की,
त्यांनी मोठ्या खेळाडूंशी स्पष्ट भाषेत समस्यांबद्दल बोलले पाहिजे. ते म्हणाले, ‘मला वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे महान खेळाडू आहेत. मी असे म्हणेन की ५ वाजता उठून सराव करा. खेळापेक्षा कोणीही मोठे नाही. कोहली ऑस्ट्रेलियात बाहेर पडत होता. विराटशी कोणी का बोलत नाही आणि त्याला का सांगत नाही की तो चुकीचा खेळत आहे? रोहितला ५ वाजता १० किलोमीटर धावण्यास कोण सांगेल? मी सांगू शकतो. खेळापेक्षा कोणीही मोठे नाही आणि तुम्हाला नेहमीच कामगिरी करावी लागते.’

विराट-रोहित कधी मैदानात परततील?
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. ते फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसतील. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
दरम्यान, तीन एकदिवसीय आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ते खेळतील हे जवळपास निश्चित आहे. आता या मालिकेतील त्यांची कामगिरीच त्यांचे पुढील भविष्य ठरवणार आहे.
हेही वाचा:
Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!
Sarfraz khan Century: सरफराज खानने ठोकले पुन्हा शतक, टीम इंडियाच्या निवड समितीला चोख उत्तर…!
चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा