अतिशय मोठी आणि गाजलेली कारकीर्द असणारे हे 5 फलंदाज लग्नाआगोदरचं वडील झाले होते…
क्रिकेट जगतामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे लग्नाआधी वडील झाले होते. हे आश्चर्यकारक नाही, कारण आता ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. असे करणारे अनेक खेळाडू आहेत. नुकतेच जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओ मेस्सीदेखील वडील झाला आहे. विशेष म्हणजे असे अनेक क्रिकेटर्स देखील आहेत जे लग्नाआधी वडील बनले आहेत. चला तर आजच्या या लेखात आपण अश्याच काही स्टार क्रिकेटरविषयी जाणून घेणार आहोत जे लग्नाआधीच वडील बनलेत.
विनोद कांबळी (भारत) : भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी त्याच्या क्रिकेट कार्कीर्दीपेक्षा वादांमुळे खूप चर्चेतराहिला कांबळी हा असा पहिला भारतीय क्रिकेटर आहे जो लग्नाआधीच वडील झाला होता.
आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर कांबळीचे फॅशन मॉडेल एंड्री हेविटसोबत अफेअर सुरू झाले आणि काही महिन्यांनंतर तो वडील झाला. मात्र यादरम्यान दोघांनीही लग्न केले नाही. मात्र, वडील झाल्यानंतर कांबळीने आंद्रेईशी लग्न केले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव येशू ख्रिस्तियानो ठेवले आहे.
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया): या यादीत दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ‘डेव्हिड वार्नर’.ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरही लग्नाआधी वडील झाला होता. वॉर्नरची मैत्रीण कँडिसने 11 सप्टेंबर 2014 रोजी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केले. वॉर्नरच्या मुलीचे नाव एवी ठेवण्यात आले होते.
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज): वेस्ट इंडिजचा तुफानी खेळाडू ख्रिस गेलने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. तो T20 फॉरमॅटचा स्पेशालिस्ट खेळाडू मानला जातो. गेल आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा बॅरिज दीर्घकाळापासून एकत्र आहेत आणि गेल एका मुलाचा पिताही झाला त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले होते.
अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया): माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने त्याच्या शाळेतील मैत्रिणीशी लग्न केले. आणि ती मैत्रीण मेलिंडा गिलख्रिस्टमुळे लग्नाआधीच एका मुलाची आई झाली होती. गिलख्रिस्टचा मोठा मुलगा हॅरिसन हा विवाहपूर्व जन्माला आला होता.
अशी आणखीही काही खेळाडू आहेत जे लग्नाआधी वडील बनले होते. शिवाय फक्त क्रिकेट क्षेत्रातच नाय तर बॉलीवूड, अभिनय, आणि तर क्षेत्रातदेखील अश्या पद्धतीने लग्नाआधी लिव्ह-इन मध्ये राहून मुले जन्माला घालणे, सध्या नॉर्मल अशी गोष्ट झालीय..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..