निवृत्ती घेईपर्यंतही इंग्लंडचा ‘स्टुअर्ट’ एक नाव कधीच विसरणार नाय…ते म्हणजे ‘जसप्रीत बूमराह’..
इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला अनेक आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळाली. रवींद्र जडेजाच्या शतकाचे कौतुक संपत नाही तोच सर्व प्रेक्षक जसप्रीत बुमराहच्या नावाचा जप करायला लागले.
होय, बूमराहनं कामच तर तसं केलं आहे.
भारताच्या डावाच्या अखेरीस या सामन्यात टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या बुमराहने गोलंदाजीपूर्वी फलंदाजी करताना दाखवलेला पराक्रम क्वचितच कोणी विसरू शकतील. त्याने इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाविरुद्ध एका षटकात 35 धावा ठोकत इतिहाच रचलाय.
जडेजाच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाने इंग्लंडने 16 धावांत 1 गडी गमावला. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे भारताच्या नावावर आहे, रवींद्र जडेजाने या सत्रात आपले शतक पूर्ण केले, भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात ३३८/७ धावांवर केली.
या सामन्यातीलआतापर्यंतचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह. ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. बुमराहने अवघ्या 16 चेंडूत 31 धावा केल्या, त्यापैकी स्टुअर्ट बोर्डाच्या षटकात त्याने 23 धावा जोडल्या. पण या षटकात एकूण 35 धावा झाल्या आहेत ज्यात एक्स्ट्रा मिळून कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका षटकातील सर्वाधिक धावा आहेत. बुमराहच्या या कामगिरीनेसध्या तो पहिल्याच सामन्यात हिरो बनलाय..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..