KKR vs LSG: रिंकू सिंहने मोडले एकाच सामन्यात 5 विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा युवा खेळाडू..!

KKR vs LSG: आयपीएलमध्ये काल (26 एप्रिल)  कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) ने खनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) एक शानदार खेळी साकारली आणि आपल्या संघाला ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय मिळवून दिला. रिंकूने केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावरच सर्वांना प्रभावित केले नाही, तर क्षेत्ररक्षणातही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली, तसेच सामन्यादरम्यान एकूण चार झेलही टिपले.

KKR vs LSG: रिंकू सिंहने मोडले एकाच सामन्यात 5 विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा युवा खेळाडू..!

या कामगिरीसह त्याने या सामन्यात  अनेक महत्त्वाचे विक्रम देखील आपल्या नावी केले. नक्की कोणते आहेत ते विक्रम जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून सविस्तर..

KKR vs LSG: रिंकू सिंहने रचला इतिहास, एक नाही तर अनेक विक्रम नावावर.!

१. ५० हून अधिक धावा आणि चारपेक्षा जास्त झेल घेणारा चौथा खेळाडू:

रिंकूने या सामन्यात फलंदाजी करतांना  अवघ्या ५१ चेंडूंमध्ये ८३ धावा कुटल्या. त्याव्यतिरिक्त, क्षेत्ररक्षण करताना त्याने चार झेलही घेतले. या कामगिरीसह, आयपीएलच्या इतिहासात एकाच सामन्यात ५० हून अधिक धावा आणि चार किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरला.रिंकूआधी केवळ 3 खेळाडुंच अशी कामगिरी करु शकले आहेत ज्यात विराट कोहलीचा समावेश आहे.

२. आयपीएलमध्ये दोनदा एकाच डावात चार झेल घेणारा खेळाडू.

आयपीएलच्या इतिहासात, KKR कडून खेळताना एकाच सामन्यात चार झेल घेणारे जॅक कॅलिस आणि रिंकू सिंग हेच दोन खेळाडू आहेत. मात्र, हा पराक्रम दोनदा करणारा रिंकू हा एकमेव खेळाडू आहे. लखनौविरुद्धच्या या सामन्यापूर्वी, २०२२ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळतानाही त्याने चार झेल घेतले होते.

३. कारकिर्दीतील सर्वोच्च T20 धावसंख्या

रिंकूने आपल्या T20 कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्येची खेळी साकारली. त्याने ८३ धावा केल्या आणि आपलाच जुना विक्रम (७९ धावा) मोडीत काढला हा विक्रम त्याने २०२२ मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना पंजाबविरुद्ध रचला होता. आता रिंकूची टी-२० मधील सर्वाधिक धावसंख्या ही ८३ धावा एवढी आहे.

KKR vs LSG: रिंकू सिंहने मोडले एकाच सामन्यात 5 विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा युवा खेळाडू..!

४.  कारकिर्दीतील ३०० चौकार पूर्ण.

लखनौविरुद्धच्या सामन्यात, रिंकूने T20 क्रिकेटमध्ये ३०० चौकारांचा टप्पा गाठला. या सामन्यापूर्वी रिंकूच्या नावावर २९८ चौकार जमा होते; या सामन्यात त्याने ७ चौकार मारले, ज्यामुळे T20 मधील त्याच्या कारकिर्दीची एकूण चौकारांची संख्या ३०५ वर पोहोचली. केकेआरसाठी त्याने आतापर्यंत 116 चौकार मारले आहेत तर उर्वरित चौकार हे देशातर्गत आणि टीम इंडियासाठी खेलाताना मारले आहेत.


हेही वाचा:

Leave a Comment