भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर, रहाणेने टीम इंडियाचे व्यवस्थापन आणि वरिष्ठ खेळाडूंबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडच्या काळात भारताला मायदेशातही कसोटी सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाच्या या पराभवांमुळे रहाणे व्यथित झाला आहे. त्याचे असे मत आहे की, केवळ युवा खेळाडूंना संधी देऊन कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळणार नाही. कसोटी संघात अधिक वरिष्ठ खेळाडूंना कायम ठेवावे आणि त्यांना योग्य तो मान द्यावा, असा सल्ला त्याने दिला आहे.
स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव. – अजिंक्य राहणे
‘स्टिक टू क्रिकेट’ (Stick to Cricket) या पॉडकास्टवर बोलताना अजिंक्य रहाणेने भारतीय कसोटी संघाचे भविष्य आणि वरिष्ठ खेळाडूंचा आदर करण्याचे महत्त्व यावर मोकळेपणाने चर्चा केली. कसोटी क्रिकेटमधील यशासाठी वरिष्ठ खेळाडूंना संघात कायम ठेवणे आणि त्यांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याला वाटते. रहाणे म्हणाला,
“गेल्या दोन वर्षांपासून मी कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. घरी बसून मी भारतीय संघाला मायदेशातही कसोटी सामने हरताना पाहिले आहे. मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी खंबीर खेळाडूंची गरज असते असे खेळाडू जे कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहून संघासाठी लढा देऊ शकतील.”
“I feel Test cricket needs character.” 😤
Ajinkya Rahane on what makes Test teams successful. 💪 pic.twitter.com/vU6RkeYDB4
— Stick to Cricket (@StickToCricket) August 5, 2026
तो पुढे म्हणाला,
“आजकाल अनेक संघ कठीण सत्रांमध्ये (sessions) आपली पकड टिकवून ठेवताना दिसत नाहीत. मला कोणत्याही विशिष्ट संघाचे नाव घ्यायचे नाही, पण कठीण सत्रांमध्ये खेळाडूंनी लढाऊ वृत्ती दाखवावी अशी माझी इच्छा आहे. मी त्याच्यासोबत [गौतम गंभीर] खेळलो आहे. तो केकेआरचा (KKR) प्रशिक्षक असताना मी त्या संघात नव्हतो; प्रशिक्षक म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली मी कधीच खेळलो नाही. आम्ही इंग्लंड दौऱ्यावर आणि भारतात एकत्र खेळलो होतो. पण मला वाटते की कसोटी क्रिकेट म्हणजे टप्प्याटप्प्याने (सत्रानुसार) खेळणे म्हणजेच संयमाने कठीण परिस्थितीचा सामना करणे.
राहणेचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा..!
अजिंन्क्य राहणे ने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा टप्पा ओलांडला असून तो आता निवृत्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवशीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र शेवटी त्याला आशा सोडून द्यावी लागली. राहणेची भारतीय संघातील कामगिरी दमदार होती. विशेषता कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एक छाप सोडली होती.
हेही वाचा:
