ड्रग्स प्रकरणात अडकलेली ही बॉलीवूड अभिनेत्री आजसुद्धा फरार आहे, कधीकाळी आपल्या मादक अदानी लावायची लोकांना वेड..

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

ड्रग्स प्रकरणात अडकलेली ही बॉलीवूड अभिनेत्री आजसुद्धा फरार आहे, कधीकाळी बॉलीवूडवर करायची राज्य..


बॉलीवूड आणि ड्रग्सचा किती जवळचा संबंध आहे हे तर सर्वांनाच माहित आहे परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. सुशांत सिंग असो की किंग खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी यांची सुद्धा चौकशी झाली होती.

हे पहिले प्रकरण नाही ज्यामध्ये एखाद्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. यापुर्वीपण आपण पहिले आहे कि नव्वदच्या दशकातील सर्वात टॉपची अभिनेत्री ममता कुलकर्णीने कश्याप्रकारे ड्रग्स आणि अंडरवर्ल्ड सोबत असणाऱ्या संबंधांमुळे आपले आयुष्य स्वताच उद्वस्त करून घेतले आहे.

९० च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव ड्रग्स स्मगलिंग सारख्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा जोडल्या गेले आहे. विक्की आणि ममता हे पती पत्नी असल्याच्या अफवा अनेक वेळा पसरल्या होत्या परंतु ममता कुलकर्णीने त्यांचे लग्न झाले नसल्याचे तसेच या प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

 अभिनेत्री

सुरुवातीला ममताचे संबंध हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यासोबत होते असेही म्हटले जाते. परंतु यानंतर तिचे नाव हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर विजय गोस्वामी ( विक्की) याच्यासोबत जोडल्या गेले. विक्की सोबत ममता दुबई आणि केनिया मध्ये राहत असल्याचे समोर आले होते. आपण विक्कीसोबत लग्न केले नसल्याचे आणि केवळ त्याला जेलमध्ये भेटण्यासाठी गेल्याचे ममता एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

१३ ऑगस्ट २०१६ रोजी पोलिसांनी २ आरोपींना १२ लाख रुपये किम्मत असलेल्या एफेड्रीन सोबत रंगेहात पकडले होते. या गुन्हेगारांच्या मदतीने पोलिसांनी २००० कोटी रुपये किंमतीच्या मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. या प्रकरणामध्ये १४ लोकांना अटक झाली होती. या प्रकरणामध्ये ममता कुलकर्णीचे नाव आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

या प्रकरणामध्ये ममता आणि तिच्या प्रियकराविरुध्द ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वारंट पण पाठवला होता. अटक होणार या भीतीने दोघांनीही देश सोडून बाहेर देशात पळ काढला होता. यानंतर ठाणे न्यायालयाने विक्की गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांना फरार घोषित केले होते. त्यांची संपती जप्त करण्याचे आणि बँक खाते सील करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

ममता कुलकर्णी हि नव्वदच्या दशकात अगदी नावाजलेली अभिनेत्री म्हणून प्रसिध्द होती. ममताने बॉलीवूड मधील मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या ममताच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आली कि,आज तिच्याच वादग्रस्त जीवनावर चित्रपट बनवल्या जाणार आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या जीवनावर आधारित असलेले बिलाल सिद्दीकी यांचे पुस्तक द स्टारडस्ट अफेअर चे (the stardust affair) सर्व अधिकार आता चित्रपट निर्माता निखील द्विवेदी यांनी विकत घेतले आहेत.

या पुस्तकावर निखील लवकरच एक चित्रपट बनवणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या पुस्तकात ममता कुलकणीच्या आयुष्यातील लोकांना माहित नसलेल्या अनेक गोष्ठींचा खुलासा केला आहे. एका अभिनेत्रीपासून अंडरवर्ल्डच्या मदतीने गॉडमदर बनण्यापर्यंत ममता नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे त्यामुळे तीच्यावर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

 

२० एप्रिल १९७२ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या ममता कुलकर्णीने आपल्या करिअरची सुरुवात १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिरंगा या चित्रपटातून केली होती. राजकुमार आणि नाना पाटेकर यांसारख्या मोठ्या अभिनेत्याची भूमिका असलेल्या या चित्रपटात तिचा खूप लहान रोल होता. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला आशिक आवारा हा ममताचा पहिला हिट चित्रपट होता.

ड्रग्स प्रकरणात अडकलेली ही बॉलीवूड अभिनेत्री आजसुद्धा फरार आहे, कधीकाळी आपल्या मादक अदानी लावायची लोकांना वेड..

यानंतर ममता कुलकर्नीला वक्त हमारा है, क्रांतिवीर यांसारखी सुपरहिट चित्रपट मिळाले. १९९५ मध्ये आलेल्या करण अर्जुन या चित्रपटाने ममताला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. पुनर्जन्मावर आधारित असलेल्या या चित्रपटातील सलमान खान आणि मामताची जोडी हि लोकांना खुप आवडली होती.

१९९५ मध्येच ममताचा बाजी हा चित्रपट हिट झाला होता ज्यामध्ये अमीर खान याने मुख्य भूमिका साकारली होती. याच वर्षी प्रदर्शित झालेला सबसे बडा खिलाडी या चित्रपटातील ममता आणि अक्षय कुमारच्या जोडीने सगळीकडे हंगामा केला होता. १९९६ मध्ये ममताने राजकुमार संतोषी यांच्या घातक चित्रपटात कैमियो रोल केला होता. या चित्रपटातील कोई जाये तो ले जाये हे गीत दर्शकांमध्ये खुप लोकप्रिय झाले होते. यानंतर ममताने नसीब, चाइना गेट, छुपा रुस्तम, किला यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

२०१६ पासून ममता कुलकर्णी चित्रपट जगापासून दूर आहे. ती आता कुठे राहत आहे याबद्दल सविस्तर माहिती कुणालाही नाहीये. काही दिवसांपूर्वी तिच्या साध्विच्या रूपातील फोटो व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे ती साध्वी बनली आहे अशीही चर्चा मिडीयामध्ये होती.


हेही वाचा:

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top