रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात भांडण पेटलंय,त्याच कारण बनलाय तो हा किस्सा..

By | August 12, 2022

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात भांडण पेटलंय,त्याच कारण बनलाय तो हा किस्सा..


कथित माजी जोडपे ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे,असं म्हटल तर वावग ठरणार नाही.  कारण सध्या तरी सोशल मिडीयावर या दोघांच्या भांडणाचीचं चर्चा आहे. हे भांडण मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु झालय. नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया सविस्तररित्या..

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांची अनेक फोटो सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत . तिच्या कथित नातेसंबंधांबद्दल इंटरनेटवर फिरत असलेल्या कथांवर स्पष्टीकरण देत उर्वशीने खुलासा केला की ती मुंबईत मिस्टर ‘आरपी’ ला भेटली होती. उर्वशीने त्या व्यक्तीची ओळख उघड केली नसली तरी सोशल मीडियावर लोकांचा अंदाज आहे की ती नक्कीच ऋषभ पंतबद्दल बोलत आहे.

रिषभ पंत

हेही वाचा:दारूंच्या जगातील बिग ब्रदर असलेल्या पटियाला पेगने प्रसिद्ध व्हायच्या आधीच आयरिश पोलो संघाचा माज उतरवला होता.

उर्वशीच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया म्हणून, ऋषभ पंतने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ‘हे विचित्र आहे की लोक फक्त थोडी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी मुलाखतीत खोटे बोलतात. काही लोक प्रसिद्धी आणि नावासाठी इतके तहानलेले कसे आहेत हे पाहून वाईट वाटते. देव त्यांना आणखी जास्त प्रसिद्ध देवो  देव त्यांना आशीर्वाद देवो.’ #merapichachorhoBehen #jhutkibhilimithotihai

अशी स्टोरी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर लावली होती.

उर्वशीने आता दोघांमधील हे सोशल मीडिया युद्ध वाढवले ​​आहे. तिने रिषभ पंतच्या स्टोरीला रिप्लाय देतांना इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात उर्वशीने  लिहिले की, ‘छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा. तुझ्यासारख्या किद्डू साठी बदनाम व्हायला मी मुन्नी नाहीये.’ #HappyRakshabandhan #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl

रिषभ पंत

 

अशी पोस्टच तिने आपल्या इन्स्टाग्राम वालवर शेअर केल्यामुळे आता हा वाद आणखीनच वाढलाय.

हेही वाचा:दाक्षिणात्य खाद्य संकृतीचा अभिमान असलेल्या ‘सांबर’चा शोध छत्रपती संभाजीराजेंनी लावलाय..

अशी झाली वादाला सुरवात..

उर्वशी रौतेलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘वाराणसीमध्ये शूटिंग करून मी दिल्लीत आले. माझा दिल्लीत शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले होते. तेव्हा आरपी मला भेटायला आला होता आणि तो लॉबीत माझी वाट पाहत होता. दहा तासांच्या शूटिंगनंतर जेव्हा मी परत आले तेव्हा मी खूप थकले होते आणि झोपी गेले. त्याने मला खूप फोन केले परंतु मी खाली लॉबीमध्ये आले नाही. मला जाग आली तेव्हा त्याचे  16-17 मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणाळे की तू मुंबईला येशील तेव्हा भेटू.

उर्वशीच्या नेमक्या याच वक्तव्याने रिषभ पंत चा संताप अनावर झाला आणि त्याने चक्क आपल्या  सोशल मिडीयावर स्टोरी टाकली ज्यात त्याने उर्वशीला नाव न घेता टार्गेट केलं. आणि दोघांमध्ये सोशल मिडिया युद्ध  सुरु झालं.

 

या सगळ्यांमध्ये  व्हिडीओ ग्राफर पापराझीची भूमिका ही महत्वाची ठरतेय . कारण उर्वशीला बोलतं करणारा व्हिडीओ ग्राफर दुसरा कोणी नसून स्वतः पापराझी आहे. आता रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील हा वाद नक्की किती लांबतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

Leave a Reply

Your email address will not be published.