हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय..

हरत असलेला सामना जिंकवून अक्षर पटेलनं स्वतःच करिअर वाचवलंय..


 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला गेला. हा सामनाही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून खेळवण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली तर साई हॉपच्या शानदार शतकानंतर वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले.अखेर रोमांचक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. , या विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे अक्षर पटेल, ज्याने 64 धावांची नाबाद खेळी खेळली. पटेलने प्रथम गोलंदाजीत विकेट घेतली आणि त्यानंतर 35 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची तुफानी खेळी केली. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन चेंडूत 6 धावांची गरज होती आणि पटेलने षटकार मारून खेळ संपवला. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

अक्षर पटेल

भारताने 49.4 षटकात 312 धावांचे लक्ष्य गाठले. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित षटकांत 6 बाद 311 धावा केल्या. शाई होपने आपल्या 100 व्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले. होपने 125 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 115 धावांची खेळी केली. दुसरीकडे कर्णधार निकोलस पूरनने 74 आणि काइल मेयर्सने 39 धावा केल्या.भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने शानदार गोलंदाजी केली. त्याने वेस्ट इंडिजकडून 3 बळी घेतले. तर दीपक हुडाने 9 षटकात 42 धावा देत एक विकेट घेतली. अक्षर पटेलने 9 षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली. युझवेंद्र चहलनेही एक विकेट घेतली. आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांना एकही यश मिळाले नाही. गेल्या सामन्याचा हिरो ठरलेल्या सिराजला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.

अक्षर पटेल

हा झाला सामन्याचा सारांश…

तर विषय असा आहे की, अक्षर पटेल साठी ही सिरीज म्हणजे शेवटची संधीच म्हणावी लागेल. कारण तो या दौर्यामध्ये संघाचा अंतिम 11 मधील खेळाडू नव्हताच. रवींद्र जडेजा ऐनवेळी जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी पटेलला संघात संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत स्वतःचे कौशल्य सिद्ध केलं. गेल्या अनेक दिवसापसुन  अक्षरला भारतीय  संघात जास्त संधी मिळत नव्हती. त्याचे दोन महत्वाचे कारण म्हणजे जडेजा आणि दुसरा आश्वीन..

संघातील अष्टपैलू जागा भरून काढण्यात हे दोन खेळाडू कोणतीही कसर सोडत  नव्हते.आणि म्हणूनच अक्षर पटेल जास्त वेळ तर बेंचवरच दिसायचा.. इंग्लंड दौऱ्यातही अक्षरला जास्त संधी मिळाली नाही. त्यामुळेचं की काय अक्षर पटेल लवकरच भारतीय संघातून बाहेर होतो की काय, असं जाणकारांना वाटायला लागलं. परंतु कालच्या सामण्यात अक्षरने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या करिअरला नवसंजीवनी मिळालीय..असचं म्हणावं लागेल..

एकंदरीत अक्षर आता आपला हा प्रवास किती दिवस लांबवू शकतो हे  पाहणे ही रंजक ठरणार आहे..


हेही वाचा:

भारतातील या रहस्यमय रेल्वे स्टेशनवर रात्री कोणीही थांबत नाही, 3 नंबरच्या स्टेशनवर तर दिवसा ही जाण्यास घाबरतात लोक..

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top