Asia Cup 2025 Live: पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंग रचू शकतो इतिहास?, ऐतिहासिक विक्रमापासून केवळ एक विकेट दूर!

Asia Cup 2025 Live: : आशिया खंडातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा  आशिया कप २०२५ (Asia Cup 2025)  ९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये अफगाण संघाने विजय मिळवला.

आज दुसरा सामना भारत आणि UAE (IND vs UAE) यांच्यात सायंकाळी 7वाजता सुरु होईल . टीम इंडिया दुबईमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा फक्त एकाच खेळाडूवर असतील.

IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार, पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?

हा दुसरा तिसरा कोणी नसून डावखुरा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग आहे. UAE विरुद्धचा हा सामना अर्शदीपसाठी खूप खास असणार आहे.कारण या सामन्यात तो एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

IND vs UAE : भारताचे मिशन आशिया कप आजपासून सुरु, UAE सोबत भिडणार टीम इंडिया; पहा कधी ?.कुठे? पाहू शकता लाइव्ह सामना?

Asia Cup 2025 Live: : अर्शदीप सिंग रचणार इतिहास ?

आशिया कप २०२५ मध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असलेला अर्शदीप सिंग सध्या ९९ विकेटसह उभा आहे आणि पुढचा विकेट घेताच तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज बनेल.

आतापर्यंत कोणताही भारतीय हा आकडा गाठू शकलेला नाही. अर्शदीपने २०२२ मध्ये पदार्पण केले आणि अवघ्या तीन वर्षांत तो या मोठ्या टप्पाच्या उंबरठ्यावर आहे. १०० बळी घेताच तो सिद्ध करेल की टी२-० मध्ये अर्शदीपसारखा सातत्यपूर्ण कोणीही नाही.

Asia Cup 2025 Live: पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंग रचू शकतो इतिहास?, ऐतिहासिक विक्रमापासून केवळ एक विकेट दूर!

टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

  • अर्शदीप सिंग – ६३ सामन्यांमध्ये ९९ बळी
  • युजी चहल – ८० सामन्यांमध्ये ९६ बळी
  • हार्दिक पंड्या – ११४ सामन्यांमध्ये ९४ बळी
  • जसप्रीत बुमराह – ७० सामन्यांमध्ये ८९ बळी
  • आर. अश्विन – ६५ सामन्यांमध्ये ७२ बळी

हेही वाचा:

Asia Cup 2025: भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत 15 लाख? तिकिटांचा काळाबाजर उफाळला..!

 Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!


error: