रवींद्र जडेजा जखमी होताच या खेळाडूची चमकली किस्मत, गेल्या अनेक दिवसापसुन पाहत होता संधीची वाट…
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, या मालिकेदरम्यान संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे, त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यापासून श्रेयस अय्यरला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तर दुसरीकडे जडेजाच्या जागी सध्या फॉर्मात नसलेल्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे, हा खेळाडू या सामन्यातही फ्लॉप ठरला.
रवींद्र जडेजा जखमी झाल्यानंतर शिखर धवनने अष्टपैलू अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. मात्र तो या संधीचा फायदा घेऊ उचलू शकला नाही. या सामन्यातही अक्षर पडेल काही खास कामगिरी करू शकलेला नाही.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
प्रथम फलंदाजी करताना अक्षर पटेल 21 चेंडूत 21 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकारही मारला, त्याने 7 षटके टाकून 40 धावा दिल्या आणि एकही विकेट घेण्यात अपयशी ठरला, इंग्लंड मालिकेदरम्यान त्याने त्याला एकही विकेट दिली नाही. टी-20 मालिकेदरम्यान त्याला संघातून वगळण्यात आले होते, त्यानंतर तो संघात सामील झाला नाही.
रवींद्र जडेजा मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर गेला आहे , वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहभागी होण्याचा निर्णय वैद्यकीय संघाच्या निर्णयानंतरच कळेल. आता जडेजा नसल्यामुळे पुन्हा अक्षरला दुसऱ्या सामन्यात संधी मिळेलच ,परंतु तो त्या संधीचा फायदा घेऊ शकतो का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..